---Advertisement---

IND vs ENG: “मी पण खेळतोय रे भाऊ” रिषभ पंतचा हटके अंदाज, पंतचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल!

On: सोमवार, जून 23, 2025 1:50 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) संघात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना लीड्समध्ये खेळला जात आहे. तिसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत टीम इंडिया (Team india) 96 धावांनी पुढे आहे. दुसऱ्या डावामध्ये भारतीय संघाने दोन खेळाडू गमावून 90 धावा केल्या होत्या. रिषभ पंत (Rishbh Pant) त्याच्या वेगवेगळ्या अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. तो कधी अंपायरशी भांडताना दिसला तर कधी त्याच्या मजेशीर अंदाजात सुद्धा तो पाहायला मिळतो. या यष्टीरक्षक फलंदाजाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो विकेटकीपिंग करत असताना जडेजा सोबत मजा घेताना दिसत आहे.

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) गोलंदाजी करत होता आणि स्ट्राइक वर फलंदाजी करण्यासाठी बेन डकेट (Ben Duckket) होता. जडेजाच्या एका चेंडूवर बेन डकेटने रिव्हर्स स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो पूर्णपणे चुकला. चेंडू लेग स्टंपच्या खूप बाहेर होता, ज्यामुळे पंतने चेंडू पकडण्यासाठी प्रयत्न केला. पण त्यानंतर रिषभ पंत जे काही म्हणाला, ते ऐकून प्रत्येकाला हसू येईल. रिषभ जडेजाला म्हणाला, ‘भाऊ मी सुद्धा खेळत आहे’ तुझ्या चौकाराच्या चक्करमध्ये मला चौकार देऊ नकोस.

इंग्लंडच्या डावामध्ये 61 व्या षटकात हॅरी ब्रूकने (Harry Brook) मोहम्मद सिराजच्या (Mohmmed Siraj) चेंडूवर एक जोरदार चौकार झळकावला होता. त्यानंतर कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) आणि रिषभ पंत (Rishbh Pant) अंपायर कडे चेंडू बदलण्यासाठी मागणी करत होते. अंपायरने चेंडू चेक केला आणि तो अजूनही खेळण्या योग्य आहे असे सांगितले. त्यानंतर रिषभ पंतला राग आला आणि त्याने अंपायर सोबत वाद घातला. त्याचे म्हणणे न ऐकल्यामुळे रिषभ पंतला राग आला आणि त्याने अंपायर समोर चेंडू फेकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---