---Advertisement---

रक्कम ऐकून अवाक् व्हालं, भारताबरोबर सामने न झाल्याने पाकिस्तानचे मोठे नुकसान

On: शुक्रवार, एप्रिल 17, 2020 3:41 PM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) २००८ पासून भारताबरोबर द्विपक्षीय क्रिकेटचे सामने खेळता आलेले नाहीत. त्यामुळे पीसीबीला आपल्या प्रक्षेपण हक्कातून (Media Rights) करारातून जवळपास ९ कोटी डॉलर रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन्ही देशात तणावाचे वातावरण असल्यामुळे भारतीय संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्येच पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळताना दिसतो.

काही वृत्तांमधील माहितीनुसार, पीसीबीचा (Pakistan Cricket Board) मागील ५ वर्षांचा करार या महिन्यात संपला आहे. ज्यामध्ये भारताविरुद्धच्या देशांतर्गत मालिकांचा समावेश होता.

“दुर्दैवाने पाकिस्तानने या कराराअंतर्गत भारताविरुद्ध २ मालिका खेळलेल्या नाहीत. टेन स्पोर्ट्स आणि पीटीव्ही या प्रसारकांनी करारानुसार एकूण रकमेतून ९ कोटी डॉलर (9 Million Dollar) इतकी रक्कम वजा केली आहे,” असेही सूत्राने पुढे सांगितले.

दहशतवादी घटनांमुळे दोन्ही देशांमधील संबंध चांगले नाहीत. याचा क्रीडा संबंधांवरही परिणाम झाला आहे. एकीकडे पाकिस्तानच्या खेळाडूंकडून वनडे मालिकेच्या आयोजनाची चर्चा वारंवार केली जात आहे. तर दुसरीकडे बीसीसीआय याला विरोध दाखवत आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-वनडेत पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे ५ महान गोलंदाज

-जो विक्रम भारताच्या नावावर हवा होता तो आहे पाकिस्तानच्या नावावर

-भारतीय संघातील या खेळाडूमुळेच केदार खेळू शकला एवढे वनडे सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---