मुंबई – चार वर्षांपूर्वी एका मोठ्या पडद्यावर बुधिया सिंग बॉर्न टू रन हा चित्रपट आला होता. बहुतेक लोक या चित्रपटाला विसरले असतील ज्याप्रमाणे एखाद्या फिल्म स्टारला चित्रपट येण्यापूर्वीच विसरले जाते. सोमेन्द्र पढीचा हा चित्रपट एका हरवलेल्या स्टारला जगाशी ओळख करून देण्यात यशस्वी ठरला असला तरी चार वर्षांनंतर मात्र हा धावपटू गडप झाला आहे. मनोज वाजपेयी यांनी अभिनय केलेला हा चित्रपट जगातील सर्वात युवा धावपटूंवर आधारित आहे. या अभिनयाबद्दल त्याला 2016 साली बेस्ट चिल्ड्रन फिल्म्स नॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.
2002 साली जन्मलेल्या बुधिया सिंगने अवघ्या चार वर्षांचा असताना धावण्याच्या स्पर्धेत विक्रम केला. सात तास दोन मिनिटांत पुरी ते भुवनेश्वर असा 65 किलोमीटरचे अंतर त्याने धावून पूर्ण केले. 2006 साली लिम्का बुकने त्याची दखल घेत जगातील सर्वात युवा धावपटू म्हणून त्याच्या विक्रमाची नोंद केली. पुढे त्यास भारताचे भविष्य म्हणून ओळखू लागला लागले. मात्र अचानक हा स्टार दिसेनासा झाला.
2016 साली चित्रपटाच्या उद्घाटनाप्रसंगी पुन्हा एकदा बुधियाचे नाव समोर आले. हा युवा खेळाडू नेमका गेला कुठे असे अनेकांना प्रश्न पडला. जो खेळाडू भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये एक आशास्थान बनवून राहिला होता. बालवयातच विक्रमाला गवसणी घालणाऱ्या बिरंची दासचा हा शिष्य रातोरात स्टार झाला. प्रत्येक ठिकाणी बुधिया आणि त्याच्या प्रशिक्षकांचा सन्मान होऊ लागला. मात्र अचानक एके दिवशी जगात पुन्हा अंधार पसरला.
बुधिया सिंगला प्रशिक्षक मिळणार काही दिवसांत त्या दोघांची ताटातूट होते. आणि काही दिवसांतच या खेळाडू आणि प्रशिक्षकांची ताटातूट होते ती कहाणी जोडून एका चित्रपटासारखीच.
बुधिया हा जेव्हा दोन वर्षांचा होता त्याच्या आईने त्याला आठशे रुपयांमध्ये एका फेरीवाल्याला विकले होते. ती बातमी प्रशिक्षक बिरंची यांच्याकडे गेली होती. बिरंची हे तेव्हा भुवनेश्वर येथील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचे अध्यक्ष होते. बुधियाला विकल्याची बातमी ऐकताच त्यांनी स्वतःच्या खिशातून आठशे रुपये देऊन बुधियाला सोडवून घेतले. तेव्हापासून बुधिया बिरंचीचा सर्व काही झाला होता. बिरंचीने बुधियाची प्रतिभा ओळखली होती. बुधिया हा चांगला धावपटू होऊ शकतो हे त्यांनी ओळखून द्याला खास प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली .
२००६ विश्वविक्रम केल्यानंतर बुधिया स्टार झाला होता. त्यानंतर २००७ साली बालकल्याण विभागाने बुधियाला मॅरेथॉन स्पर्धेत भागवण्यास प्रतिबंधित केले होते. बुधियाच्या प्रशिक्षकाने यावरती हायकोर्टात अपिल दाखल केले. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही बुधिया कमी वयात मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन धावल्याने बर्नआऊटचा शिकार होऊ शकत असे सांगत त्याला मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ दिले नाही. त्यानंतर २००७ बुधियाला त्याच्या प्रशिक्षकापासून वेगळे केले आणि त्यास साई हॉस्टेलवर पाठवण्यात आले . काही दिवसांनंतर जुन्या वादाचा राग मनात धरून बुधियाच्या प्रशिक्षकाचा खून करण्यात आला. एका चांगल्या प्रशिक्षकांची आणि खेळाडूंची त्यानंतर ताटातूट झाली. त्यामुळे एका चांगल्या सूर्याचा उगवण्यापूर्वीच अस्त झाला.