आगामी चॅम्पियन्स ट्रॅाफी (ICC Champions Trophy 2025) स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या खालच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहला चॅम्पियन्स ट्रॉफीमधून वगळणे हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता भारतीय संघासमोर असा प्रश्न आहे की, बुमराशिवाय भारताच्या वेगवान गोलंदाजीचे काय होईल?
तत्पूर्वी या प्रश्नाचे उत्तर भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी दिले आहे. कपिल देव यांनी सांगितले की, जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत भारतीय संघावर किती परिणाम होईल? तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाकडे आता कोणते पर्याय उपलब्ध आहेत.?
कपिल देव म्हणाले की, “भारतीय संघाला विजय मिळवावा लागेल, कारण तुम्ही एका खेळाडूवर अवलंबून राहू शकत नाही. हा कोणताही बॅडमिंटन किंवा टेनिस खेळ नाही. आमचे मोठे खेळाडू जखमी व्हावेत असे आम्हाला कधीच वाटत नाही, पण त्यांना दुखापत झाली, तर तुम्ही काय करू शकता? ते असंही म्हणाले की, “भारतीय संघाला माझ्या शुभेच्छा, चांगलं क्रिकेट खेळा मला भारतीय संघ जिंकलेला पाहायचा आहे, पण जर इतर संघही चांगलं क्रिकेट खेळत असतील तर तुम्ही त्याचं कौतुक करायला हवं.”
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध सामना खेळून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारत-बांगलादेश दोन्ही संघात (19 फेब्रुवारी) रोजी सामना खेळला जाईल. यानंतर भारतीय संघासमोर पाकिस्तानचं आव्हान असेल. भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) (23 फेब्रुवारी) रोजी समोरासमोर येतील. तसेच भारताचा शेवटचा गट सामना (2 मार्च) रोजी न्यूझीलंडविरुद्ध होईल. तत्पूर्वी भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळणार आहे.
हेही वाचा
“क्रिकेटर आहोत, नट नव्हे” अश्विनच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चा
विराट कोहली RCB कर्णधार का नाही बनला? माजी क्रिकेटपटूचा मोठा खुलासा
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: 5 फिरकीपटूंचा समावेश योग्य की चूक? अश्विनची प्रतिक्रिया…






