Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘तो पेट घेणाऱ्या कारजवळच पडलेला, मला वाटलं वाचणार नाही…’, पंतला वाचवणाऱ्या देवदूताचे मोठे भाष्य

'तो पेट घेणाऱ्या कारजवळच पडलेला, मला वाटलं वाचणार नाही...', पंतला वाचवणाऱ्या देवदूताचे मोठे भाष्य

December 30, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rishabh-Pant

Photo Courtesy: Twitter/munafpa99881129


शुक्रवारी (दि. 30 डिसेंबर) क्रिकेटविश्वाला त्यातल्या त्यात भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा अपघात झाला. या अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्या डोक्याला, गुडघ्याला गंभीर दुखापती झाल्या. याव्यतिरिक्त त्याच्या पाठ आणि पायालाही जबर मार बसला. पंतचा हा अपघात रुडकी येथे मोहम्मदपूर जाट भागात झाला. या अपघातानंतर एका बस चालकाने देवदूत बनून पंतचा जीव वाचवला. ड्रायव्हरने सर्वप्रथम बस थांबवून पंतला कारपासून दूर केले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले.

खरं तर, रिषभ पंत (Rishabh Pant) हा त्याची महागडी मर्सिडीज कार (Mercedes Benz) स्वत: चालवून रूडकी येथे जात होता. यादरम्यान त्याला डुलकी लागली आणि त्याची कार थेट दुभाजकाला जाऊन धडकत अपघात घडला. पंतने स्वत: सांगितले की, तो काच तोडून बाहेर पडला. यानंतर कारला भीषण आग लागली होती. या अपघातानंतर सुशील कुमार हे रिषभ पंत याच्या जवळ पोहोचले होते.

अपघातानंतर मागेच होती बस
पोलीस अधिकारी अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी गाडीचा अपघात झाला, त्यावेळी हरियाणा रोडवेजची बस त्याच्या गाडीच्या मागेच होती. बसचालक सुशील कुमार यांनी कार अपघात पाहून त्यांनी बस थांबवली आणि 112 क्रमांकावर फोन करून माहिती दिली. यानंतर पंतला तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यात आले.

माध्यमांशी बोलताना सुशील कुमार म्हणाले की, “मी हरियाणा रोडवेजमध्ये ड्रायव्हर आहे. मी हरिद्वारहून येत होतो. मी जसा नारसनच्या जवळ पोहोचलो, 200 मीटरपूर्वीच मी पाहिले की, दिल्लीकडून एक कार आली आणि जवलपास 60-70च्या वेगात दुभाजकाला जाऊन धडकली. या धडकेनंतर कार हरिद्वारच्या लेनमध्ये आली. मी पाहिले की, आता बसही धडकेल आणि आम्ही कुणालाच वाचवू शकणार नाही. कारण, माझ्याकडे 50 मीटरचेच अंतर होते. मी लगेच सर्व्हिस लाईनमधून गाडी पहिल्या लेनमध्ये घेतली. ती गाडी दुसऱ्या लाईनमध्ये गेली. माझ्या गाडीचा वेग 50-60 इतका होता. मी लगेच ब्रेक लावला आणि खिडकीमधून उतरून त्याच्याकडे धावलो.”

‘कारपासून दूर केले, चादरने गुंडाळले’
पुढे बोलताना सुशील म्हणाले की, “मी पाहिले की, तो व्यक्ती (रिषभ पंत) जमिनीवर पडला होता. मला वाटले, तो वाचणार नाही. कारमधून ठिणग्या उडत होत्या. त्याजवळच तो होता. आम्ही उचलले आणि कारपासून दूर केले. मी विचारले की, कारमध्ये इतर कुणी आहे का? तो म्हणाला, मी एकटाच होतो. त्यानंतर त्याने सांगितले की, रिषभ पंत आहे. मला क्रिकेटबद्दल इतकी माहिती नाही. त्याला बाजूला उभे केले, त्याच्या शरीरावर कपडे नव्हते, त्याला आम्ही चादरमध्ये गुंडाळले.” सुशील कुमार यांनी ही मुलाखत आज तकला दिली होती.

#RishabhPant#rishabpantaccident
Blood bleading face 😞 pic.twitter.com/sXR3iuOYDR

— vk18_Rs45_forever (@virat18_rs45) December 30, 2022

पंतच्या अपघाताची बातमी काही वेळातच वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. तसेच, चाहत्यांनीही तो लवकरात लवकर बरा होण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवातही केली.

नुकताच केलेला बांगलादेश दौरा
रिषभ पंत हा नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेश दौऱ्यावरील कसोटी मालिकेत भारतीय संघाचा भाग होता. यामध्ये पंतने 2 सामन्यातील 3 डावात फलंदाजी केली होती. यादरम्यान त्याने 49.33च्या सरासरीने 148 धावांचे योगदान दिले होते. ही 2 सामन्यांची कसोटी मालिका भारतीय संघाने 2-0ने नावावर केली होती. (bus driver sushil mann who saved and rescued indian wicketkeeper cricketer rishabh pant after accident)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

पंतच्या अपघाताविषयी बीसीसीआयची मोठी अपडेट, बोर्ड कुटुंबियांच्या सतत संपर्कात
Rishabh Pant Car Accident: एका डुलकीने पंतची कारकिर्द धोक्यात! इतके दिवस राहणार क्रिकेटपासून दूर?


Next Post
Photo Courtesy: Twitter/Blackcaps

अंधुक प्रकाशाने वाचवली पाकिस्तानची इभ्रत! कराची कसोटी नाट्यमयरीत्या ड्रॉ; न्यूझीलंडचा हुकला विजय

rishabh pant

'अरे मी रिषभ पंत आहे...', बस ड्रायव्हरने सांगितला घडला प्रकार, क्रिकेटपटूने स्वतः करून दिली ओळख

Rishabh-Pant-And-Shikhar-Dhawan

'गाडी हळू चालवत जा रे', शिखर धवनने 3 वर्षांपूर्वी दिलेला सल्ला पंतला आता नक्की आठवला असेल

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143