आयपीएल 2019 मध्ये प्लऑफचे सामने सुरु होण्यासाठी आता केवळ 5 दिवस राहिले आहेत. पण यावर्षी आयपीएलमध्ये अनेकदा पंचांकडून चूका झालेल्या पहायला मिळाल्या आहेत. पण या चूका सामना चालू असताना झाल्या आहेत. याबद्दल अनेक चर्चाही झाल्या.
पण 17 एप्रिलला सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना पार पडलेल्या सामन्यात नाणेफेकीवेळी चक्क रेफ्रींनी नाणेफेकीचे नाणे पूर्ण स्थिर होण्याआधीच नाणेफेक चेन्नई सुपर किंग्सने जिंकल्याचे जाहीर केले होते. मात्र ही गोष्ट कोणाच्या लक्षात आली नाही. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हैद्राबाद येथे पार पडलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा नियमित कर्णधार एमएस धोनी खेळला नव्हता. त्याने या सामन्यात विश्रांती घेतली होती. त्यामुळे या सामन्यात चेन्नईचे नेतृत्व सुरेश रैनाने केले होते.
या सामन्यातील नाणेफेकीच्या या व्हिडिओमध्ये दिसते की रैना आणि हैद्राबादचा कर्णधार केन विलियम्सन नाणेफेकीसाठी उपस्थित होते. त्यांच्यासह या सामन्यातील रेफ्री प्रकाश भट आणि निवेदक इयान बिशपही उपस्थित होते.
यावेळी जेव्हा विलियम्सनने नाणे वर फेकले तेव्हा रैनाने हेड्स असा कॉल दिला. पण प्रकाश यांनी नाण्याची गती कमी झाल्यानंतर लगेचच निर्णय दिला की रैनाने ही नाणेफेक जिंकली. पण त्यावेळी ते नाणे पुर्णपणे जमीनीवर स्थिर झाले नव्हते. मात्र तरीही प्रकाश यांनी निकाल दिला होता.
या सामन्यात रैनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण चेन्नईला प्रथम फलंदाजीला करताना 20 षटकात 5 बाद 135 धावाच करता आल्या. त्यानंतर 136 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या हैद्राबादने 16.5 षटकातच 4 विकेट्स गमावत 137 धावा करत हा सामना 6 विकेट्सने जिंकला.
The @ChennaiIPL led by @ImRaina have opted to bat first against the @SunRisers.#SRHvCSK pic.twitter.com/yTaeth0pYF
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–रैनाने रचला इतिहास, दिल्ली विरुद्धच्या सामन्यात केले तीन खास विक्रम
–ताहीरच्या सेलिब्रशनमध्ये सामील न होण्यामागच्या कारणाचा धोनीने केला खुलासा, पहा व्हिडिओ
–चपळ धोनीने केले तीन चेंडूत दोन स्टम्पिंग, पहा व्हिडिओ