मागील महिन्यात पार पडलेल्या आयपीएल 2023 लिलावात ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन याच्यावर तगडी बोली लागली. पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी इतकी घसघशीत रक्कम देत त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. मात्र, लिलावाच्या काही दिवसानंतरच त्याला ऑस्ट्रेलियासाठी खेळत असताना दुखापत झाली. त्यामुळे तो बराच काळ क्रिकेटपासून लांब राहील अशी शक्यता वर्तवली जात होते. मात्र, आता त्याच्या दुखापतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून, तो संपूर्ण आयपीएलसाठी उपलब्ध असणार आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, आयपीएलचे सीओओ हेमांग अमीन यांनी सर्व दहा फ्रॅंचाईजींना एक पत्र पाठवले असून, यामध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितलेल्या काही मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे. तसेच सध्या दुखापतग्रस्त असलेला अष्टपैलू कॅमेरून ग्रीन हा संपूर्ण आयपीएल साठी उपलब्ध असेल, असेही नमूद केले. मात्र, तो भारतात होणाऱ्या बॉर्डर-गावसकर मालिकेत खेळल्यास तिथून पुढे तो चार आठवडे गोलंदाजी करू शकणार नाही.
बॉर्डर-गावसकर मालिकेतील अखेरचा सामना 13 मार्च रोजी समाप्त होईल. याचाच अर्थ ग्रीन 13 एप्रिल पर्यंत गोलंदाजी करू शकणार नाही. आयपीएल 2023 ची सुरुवात 1 एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रीन सुरुवातीच्या 2-3 सामन्यात गोलंदाजी करताना दिसणार नाही. तसेही, मुंबई इंडियन्स संघात जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर, पियुष चावला यांच्यासारखे प्रमुख गोलंदाज असल्याने, ग्रीन प्रामुख्याने फलंदाज म्हणूनच संघात समाविष्ट होऊ शकतो.
मागील वर्षी ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला असताना, ग्रीन याने आपल्या आक्रमक फलंदाजी व उपयोगी मध्यमगती गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळेच आयपीएल लिलावात त्याच्यावर इतकी मोठी बोली लागली गेली.
(Cameron Green Available For Full IPL Cricket Australia Confirmed)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मार्टिना नवरातिलोवाला दुसऱ्यांदा झाला कॅन्सर, महान टेनिसपटूनवर यावेळी डबल अटॅक
विराटचे अतिक्रिकेट खेळणे चिंताजनक”, श्रीलंकन दिग्गजाने ओळखली भविष्याची चाहूल