---Advertisement---

अरेरे! जर हा कॅच कॅमेरॉन ग्रीनने घेतला असता, जगातील सर्वोत्तम कॅचपैकी एक असता, पाहा व्हिडिओ

On: शुक्रवार, एप्रिल 9, 2021 5:03 PM
---Advertisement---

सगळीकडे आयपीएलचे वारे वाहत असताना ऑस्ट्रेलियात मात्र, वनडे सामन्यांचे वातावरण आहे. या स्पर्धेतही अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. दरम्यान, या स्पर्धेतील एका सामन्यात कॅमेरॉन ग्रीनने एक झेल सोडला, ज्याची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. कारण जर हा झेल त्याने घेतला असता, तर तो इतिहातील सर्वोत्तम झेलांपैकी एक म्हणून गणला गेला असता, असे अनेकांनी म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या देशांतर्गत वनडे स्पर्धे सुरु आहे. या स्पर्धेत पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि टास्मानिया यांच्यात सामना खेळवला गेला. याच सामन्यात ग्रीनकडून हा झेल सुटला होता. पश्चिम ऑस्ट्रेलियाने हा सामना १५ धावांच्या फरकाने जिंकला.

जेव्हा तस्मानियाचा संघ ३०७ धावांचा पाठलाग करीत होता, तेव्हा २१ व्या षटकात वेब्स्टरने एक मोठा शॉट खेळाला त्यावेळी ग्रीन मागे पळत गेला. त्याने बाऊंड्री लाईनजवळ तो चेंडू झेलला देखील. पण नेमका ग्रीन बाऊंड्री लाईन पार करुन जात असल्याचे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने तो चेंडू बाहेर फेकला आणि बाऊंड्री लाईनच्या आत जाऊन परत उडी मारत चेंडू पकडण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र, त्याला तो चेंडू झेलण्यात अपयश आले. यावेळी वेबस्टर ३१ धावांवर खेळत होता.

जरी ग्रीनला हा झेल घेता आला नसला, तरी त्याने केलेल्या प्रयत्नांचे सध्या मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात: टॉस जिंकून बंगळुरुचा प्रथम बॉलिंगचा निर्णय; विजयी सलामी देण्यासाठी दोन्ही संघ सज्ज

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नवे अँथम साँग ऐकले का? यंदा काय आहे विशेष पाहा व्हिडिओ

आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच मुंबई, चेन्नई, हैदराबाद, बेंगलोर संघाच्या चिंतेत वाढ, ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---