सध्या चॅम्पियन्स लीगच्या पात्रता फेरीचे सामने सुरू असून मुख्य स्पर्धेला अवघे १२ दिवसच राहिले आहेत. तर चॅम्पियन्स लीगमध्ये पहिला सामना रियल विरुद्ध अॅटलेटिको माद्रिद असा १६ ऑगस्टला आहे.
जुवेंट्स या इटालियन क्लबने १९८४-८५ आणि १९९५-९६ असे दोन वेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकले आहे. म्हणजेच तब्बल २२ वर्षे झाली त्यांना ही स्पर्धा जिंकून विक्रम करण्याची संधी आहे.
तर रियल माद्रिदने सर्वाधिक असे १३ वेळा हे विजेतेपद जिंकले आहे. यामध्ये क्रिस्तियानो रोनाल्डोने सर्वाधिक असे १२० गोल केले असून तो ५ वेळा विजेतेपद जिंकलेल्या संघात होता. तर तीन अंतिम सामन्यात त्याने गोल केले आहेत.
रियलमध्ये असताना रोनाल्डोने जुवेंट्स या एकाच क्लबविरुद्ध १० गोल करून विक्रम केला. तसेच त्याने एकूण ४५० गोल रियलमध्ये असताना केले आहेत.
तसेच रोनाल्डोने चॅम्पियन्स लीगच्या साखळी फेरीतील सहाही सामन्यात गोल केले आहेत.
पोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याने जुवेंट्स फुटबॉल क्लबसोबत चार वर्षांसाठी 846 कोटी रुपयांचा करार केला आहे.
जुवेंट्स विरुद्ध रियल माद्रिद यांच्यातील सामना कायमच अटीतटीचा झाला आहे. तसेच रोनाल्डोच्या येण्याने आता जुवेंट्सच्या अटॅकींगमध्ये अजून भर पडली आहे.
उद्या होणाऱ्या इंटरनॅशनल चॅम्पियन्स कपमध्ये हे दोन संघ पुन्हा आमनेसामने येणार आहे. मात्र या सामन्यात रोनाल्डो फिट असुनही खेळणार नाही. तर रोनाल्डोच्या अनुउपस्थितीत हा सामना कोण जिंकेल हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.
याच स्पर्धेत रियलचा संघ रोनाल्डोविना खेळला. यामध्ये ते मॅंचेस्टर युनायटेडकडून २-१ने पराभूत झाले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–पहिली कसोटी: भारतीय फलंदाजांची हाराकिरी, इंग्लंडने १०००वा सामना जिंकला
–सॅम्पडोरीयाने केले रोनाल्डोला करारबद्ध