---Advertisement---

नुसता पैसा! एका सामन्यातून आयपीएल कमावते ८१ कोटी, सीएसके नाही तर ‘हा’ संघ आहे सर्वात धनाढ्य

On: मंगळवार, एप्रिल 6, 2021 11:50 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाने २००७ साली झालेला पहिला वहिला टी२० विश्वचषक जिंकला आणि भारताता टी२० क्रिकेटचे वारे वाहू लागले. या विश्वचषकानंतर केवळ १ वर्षांच्या आतच इंडियन प्रीमीयर लीग या स्पर्धेला सुरुवात झाली. साल २००८ पासून होत असलेल्या या स्पर्धेचे १३ हंगाम पूर्ण झाले आहेत. तर आता आगामी १४ वा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गेल्या १३ वर्षांत आयपीएलने खूप मोठी प्रगती केली आहे. आज आयपीएल जगात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून प्रसिद्ध आहे. या आयपीएलने अनेक खेळाडूंना एका रात्रीत करोडपती केले आहे.

आज आयपीएल ही केवळ क्रिकेटमधीलच नाही, तर जगातील श्रीमंत लीग स्पर्धांमधील एक स्पर्धा बनत आहे. आयपीएल सध्या जगात श्रीमंतीच्याबाबतीत कुठे आहे, यावर थोडी नजर टाकू.

साल २०१९-२० च्या एका रिपोर्टप्रमाणे एका आयपीएल हंगामात जवळपास ४९०० कोटी महसूल जमा होते. तसेच आयपीएलच्या एका हंगामात जवळपास ६० सामने होतात. म्हणजेच एका सामन्याचा महसून साधारण ८१ कोटी रुपये एवढा होतो. ही आकडेवारी लक्षात घेता जगातील प्रसिद्ध बास्केटबॉल लीग एनबीए आणि बेसबॉल लीग एमएलबी यांच्यापेक्षा आयपीएल आघाडीवर आहे. आयपीएलच्या पुढे फक्त सध्या इंग्लिश प्रीमीयर लीग, ला लीगा आणि एनएफएल या फुटबॉल लीग स्पर्धा आहे. त्यातही आयपीएल इंग्लिश प्रीमीयर लीग आणि ला लीगा यांच्या थोडी जवळ आहे. पण एनएफएल मात्र, या स्पर्धेत बरीच पुढे आहे.

सध्या एनबीएचा महसूल प्रतिसामना ६६ कोटी रुपये आहे. तर एमएलबीचा प्रतिसामना ३४ कोटी आहे. तसेच इंग्लिश प्रीमीयर लीगचा महसूल प्रतिसामना १३६ कोटी आहे आणि ला लीगाचा १०१ कोटी आहे. अव्वल क्रमांकावर असलेल्या एनएफएलचा महसूल प्रतिसामना ३६४ कोटी आहे.

विशेष म्हणजे एनबीए या बास्केटबॉल लीगमध्ये संपूर्ण हंगामात ३० संघांत १२०० पेक्षाही अधिक सामने होतात. या लीगचा हंगाम डिसेंबरपासून सुरु होतो आणि जुलैमध्ये संपतो. तसेच एमएलबीमध्ये दरवर्षी २००० पेक्षाही अधिक सामने होतात. तर इंग्लिश प्रीमीयर लीगमध्ये एका हंगामात ३८० सामने होतात. त्यामानाने आयपीएलमध्ये साधारण ६० सामने दर हंगामात होतात. तसेच या अन्य लीग स्पर्धांच्या तुलनेत आयपीएल कमी दिवस चालते. आयपीएलचा कालावधी हा साधारण २ महिन्यांचा असतो, तर या अन्य लीग स्पर्धा ३ महिन्यांपेक्षाही अधिक काळ चालतात.

तरी येणाऱ्या काळात आयपीएलमध्ये संघांची संख्या वाढू शकते, त्यामुळे सामन्यांचीही संख्या वाढू शकते. त्यामुळे जर आयपीएलने पुढे आणखी प्रगती केली तर जगातील पहिल्या तीन श्रीमंत लीग स्पर्धांमध्ये आयपीएलचा समावेश होऊ शकतो.

आयपीएलचे व्हॅल्युएशन- 
४७,५०० कोटी- वर्ष २०१९
४५, ८०० कोटी- वर्ष २०२० (कोरोनामुळे व्हॅल्युएशन घटले)

जगातील विविध लीगची एका हंगामाची कमाई-
९८,३०० कोटी- एनएफएल, प्रती सामना- ३६४ कोटी
५१,९०० कोटी- ईपीएल, प्रती सामना- १३६ कोटी
२९,३०० कोटी- ला लीगा, प्रती सामना- १०१ कोटी
४,९०० कोटी- आयपीएल, प्रती सामना- ८१ कोटी
६६,४०० कोटी- एनबीए, प्रती सामना- ५२ कोटी
८४,४०० कोटी- एमएलबी, प्रती सामना- ३४ कोटी

आयपीएलमधील सर्वाधिक व्हॅल्युएशन असणारे तीन संघ- 
७६१ कोटी- मुंबई इंडियन्स
६११ कोटी- चेन्नई सुपर किंग्ज
५४३ कोटी- कोलकाता नाईट रायडर्स
(हे आकडे २०२० सालचे आहे. २०१९ साली संघांचे व्हॅल्युएशन यापेक्षा जास्त होते. )

महत्त्वाच्या बातम्या-

कोणी स्पॉट फिक्सिंग केली तर कोणी प्रतिस्पर्धाच्या किनशिलात मारली; ‘ते’ मोठे वाद ज्यामुळे आयपीएलचं नाव पार धुळीस मिळालं

आयपीएल २०२१: बापाने क्रिकेटर बनवण्यासाठी सोडली नोकरी, आता लेक आपल्या नेतृत्त्वाखाली बदलणार RR चं नशीब

आयपीएल २०२१ नंतर धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीवर लागणार कायमचा ब्रेक? ‘या’ गोष्टी देत आहेत निवृत्तीचे संकेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---