भारतीय वरिष्ठ संघ आगामी कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये कसून सराव करण्यात व्यस्त आहे. येत्या ४ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचे कर्णधारपद शिखर धवनला देण्यात आले आहे. ही जबाबदारी त्याने योग्यरित्या पार पाडली आहे.
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या वनडे मालिकेत श्रीलंका संघावर २-१ ने विजय मिळवला होता. तसेच रविवारी (२५ जुलै) झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात देखील भारतीय संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून कर्णधार शिखर धवनने कौतुक केले जात आहे. अशातच पाकिस्तान संघातील यष्टिरक्षक फलंदाजानेही त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
भारतीय कर्णधार शिखर धवनचे कौतुक करताना पाकिस्तानी यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल म्हणाला की, “पहिल्या टी-२० सामन्यात शिखर धवनने कर्णधाराची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली. त्याने योग्य क्षेत्ररक्षकाला योग्य जागी आणि योग्य गोलंदाजाला योग्यवेळी गोलंदाजीला आणले. धवन एक कूल कर्णधार सारखा वाटत होता. मला तर त्यात शांत आणि संयमी कर्णधार धोनीची झलक दिसली. त्याने दबावात असताना देखील चांगली निर्णय घेतले होते. श्रीलंका संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. सुरुवातीलाच २० धावा केल्या होत्या. तरी देखील ३८ धावांनी विजय मिळवणे हे अप्रतिम कामगिरीचे एक उदाहरण आहे. या विजयाचे श्रेय धवनलाही मिळायला हवे. गोलंदाजांनीही अप्रतिम कामगिरी केली.” (Can see shades of ms dhoni in shikhar dhawan captaincy says Kamran akmal)
सामना झाल्यानंतर काय म्हणाला शिखर धवन??
सामना झाल्यानंतर शिखर धवन म्हणाला की, “श्रीलंका संघ चांगला खेळत होता. आम्हाला माहीत होते की,आमच्या फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीतून मदत मिळेल. कृणाल पंड्या आणि युजवेंद्र चहल यांनी चांगली गोलंदाजी केली. आपला पहिला सामना खेळत असलेल्या वरून चक्रवर्तीने देखील चांगले प्रदर्शन केले.”
मला वाटले की, आम्ही १०-१५ धावा कमी केल्या होत्या. परंतु नंतर आम्हाला जाणवले की, हा एक चांगला स्कोर आहे. पहिल्या चेंडूवर पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर आम्ही चांगले पुनरागमन केले. पावरप्लेच्या षटकात ५० धावा करणे चांगले होते. माझ्या मते फक्त ५ % आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. सूर्यकुमार यादव एक अप्रतिम फलंदाज आहे. त्याची फलंदाज पाहून आनंद होतो. त्याने माझ्या डोक्यावरचे ओझे कमी केले होते,” असेही त्याने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तुम्ही घरच्या मैदानावर १६० धावा करू शकत नाही, तर अजून कुठे करणार?’ दिग्गजाची श्रीलंकेवर आगपाखड
कोलंबो टी२०त ‘मांकडिंग’, दिपक चाहरची श्रीलंकेच्या फलंदाजाला चेतावणी; बघा व्हिडिओ
ऑस्ट्रेलियाने काढला पराभवाचा वचपा, ११७ चेंडू बाकी असतानाच विंडीजवर मात; वनडे मालिकाही जिंकली