चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आयोजनावर टांगती तलवार आहे. यावेळी स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करण्याच्या मानसिकतेत नाही. बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाल्यानुसार, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही. मात्र आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या हायब्रिड मॉडेलबाबत अपडेट आलेले नाही. त्यामुळे अशा स्थितीत टीम इंडिया या स्पर्धेतून आपलं नाव मागे घेऊ शकते का? आणि असं झालं तर ही स्पर्धा कशी खेळली जाणार? याबाबत आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.
पाकिस्ताननं आपल्या ड्राफ्ट शेड्यूलमध्ये भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये ठेवले आहेत, जेणेकरून ते भारताच्या सुरक्षेची चिंता दूर करू शकतील. तथापि, आतापर्यंत समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सवरून, टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानचा दौरा करण्यास तयार नाही. बीसीसीआयकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
कदाचित बीसीसीआयची मागणी मान्य करण्याशिवाय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे दुसरा पर्याय नसेल. असं असलं तरी, चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने पाकिस्तानमध्येच आयोजित केले जातील आणि कोणतंही हायब्रीड मॉडेल वापरलं जाणार नाही, यावर पीसीबी ठाम आहे. या स्थितीत टीम इंडिया या स्पर्धेतून आपलं नाव मागे घेऊ शकते. मग प्रश्न उभा राहतो की, जर भारतानं स्पर्धेतून आपलं नाव मागे घेतलं तर स्पर्धा कशी होणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ते 8 संघ पात्र ठरले आहेत, जे शेवटच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या गुणतालिकेत पहिल्या आठ स्थानी होते. 2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील गुणतालिकेत बांगलादेश हा 8वा संघ होता, तर श्रीलंकेचा संघ 9व्या स्थानी होता. आता जर टीम इंडियानं स्पर्धेतून आपलं नाव मागे घेतलं तर फक्त 7 संघ शिल्लक राहतील. अशा स्थितीत नवव्या क्रमांकाची श्रीलंका स्पर्धेसाठी पात्र ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
मराठमोळ्या क्रिकेटपटूचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत मिळाली संधी
भारताच्या माजी क्रिकेटपटूला कर्करोगानं ग्रासलं, कपिल देव यांची बीसीसीआयकडे मदतीची याचना
बाबर आझम सोबतच्या वादादरम्यान शाहिनसाठी गूड न्यूज, पाकिस्तान क्रिकेटला मिळणार ज्यूनिअर आफ्रिदी