माजी भारतीय खेळाडू आर अश्विनने (Indian Former Cricketer R Ashwin about Mohmmed Siraj) मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर काळजी व्यक्त केली आणि त्याला खास सल्ला देखील दिलेला आहे. इंग्लंड विरुद्ध खेळल्या जात असलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात सिराजची खेळी निराशाजनक राहिली. त्याच्या गोलंदाजीमध्ये लाईन लेन्थ कमी दिसत होती आणि याच कारणाने सिराज पहिल्या सामन्यात जास्त यशस्वी होऊ शकला नाही. आता आर अश्विनने सिराज विषयी त्यांच वक्तव्य केलं आहे. सिराजच्या प्रदर्शनामुळे आश्विन अजिबात आनंदी नाही.
आर अश्विनने त्याचा यूट्यूब चॅनेलवर म्हटले, सिराजला माझा एकच प्रश्न आहे? तू धावा वाचवू शकतोस? तुम्हाला विकेट घेण्याची गरज नाही, पण तू प्रत्येक षटकात चार-पाच धावा नाही देऊ शकत? जर धावा जात आहेत तर तुम्हाला बुमराहला पुन्हा खेळण्यासाठी आणावे लागेल.
सातत्याने गोलंदाजी केल्यामुळे बुमराह थकतो आणि त्यामुळे त्याचा स्पेल वाढतो आणि त्यामुळे तोपर्यंत भागीदारी वाढत जाते. किंवा तू जडेजा सोबत जाऊ शकतोस? प्रसिद्ध कृष्णा (Prasiddh Krishna) पहिल्यांदा खेळत आहे आणि त्याच्याकडे तितका अनुभव नाही. त्यामुळे सिराजला महत्वाची भूमिका करावी लागेल.
सिराजने पहिल्या डावात अतिशय वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी केली, ज्यामुळे टीम इंडियाला त्याचे परिणाम भोगावे लागले. पहिल्या डावात 27 षटके टाकली. त्यादरम्यान त्याने 4.51 च्या इकॉनॉमीसोबत धावा लुटवल्या. त्या दरम्यान त्याला फक्त 2 विकेट्स मिळाल्या. पण दुसऱ्या डावात त्याला विकेट मिळाली नाही.
त्याने 14 षटकात 51 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट भेटली नाही.बुमराह (jaspreet Bumrah) सोडल्यास कोणत्याही गोलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही. प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) सुद्धा धावा लुटवल्या. याच कारणाने टीम इंडियाला (Team India) 5 विकेट्सने सामना गमवावा लागला.






