---Advertisement---

धोनीमुळे ‘Candy Crush’ गेमची चांदी! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 3 तासात ‘एवढ्या’ लाख लोकांनी केली डाऊनलोड?

MS-Dhoni-Candy-Crush
---Advertisement---

जगभरात प्रचंड मोठा चाहतावर्ग लाभलेले अनेक क्रिकेटपटू आहेत. त्या क्रिकेटपटूंमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्या नावाचाही समावेश होतो. धोनीच्या चाहत्यांची गणना करणे जवळपास अशक्य आहे. धोनीच्या खेळण्याच्या पद्धतीपासून ते त्याच्या मैदानावरील शांत स्वभावापर्यंत अनेक गोष्टी चाहत्यांना भुरळ घालतात. सामन्याविषयी धोनी नेहमीच चर्चेत असतो, पण तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येण्याची संधी सोडत नाही. नुकताच धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो विमानात बसून गेम खेळताना दिसत आहे.

ज्यावेळी व्हिडिओतील टॅबवर लोकांचे लक्ष गेले, तेव्हा त्यांना वाटले की, धोनी कँडी क्रश (Candy Crush) गेम खेळत आहे. यानंतर ही गेम सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंड होऊ लागली. खरं तर, एमएस धोनी (MS Dhoni) त्याच्या पत्नीसोबत विमानात प्रवास करत होता. त्याचवेळी एक एअर होस्टेस त्याला चॉकलेटने भरलेला ट्रे ऑफर करते. हे पाहून धोनी हसू लागतो आणि एक चॉकलेट घेतो. अशातच लोकांची नजर त्याच्या टॅबवर पडते. यावर तो कँडी क्रशसारखी गेम खेळत होता.

एमएस धोनी कँडी क्रश (MS Dhoni Candy Crush) खेळत असल्याचे पाहून सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. यावेळी ट्विटरवर कँडी क्रश हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला, तेव्हा काही युजर्सनी म्हटले की, धोनी जो गेम खेळत आहे, ती गेम कँडी क्रश नाही, तर पेट रेस्क्यू सागा (Pet Rescue Saga) आहे. काहींनी असेही म्हटले की, “अरे व्वा! आम्हीही खेळणार कँडी क्रश”

अवघ्या 3 तासात 30 लाखांहून अधिक डाऊनलोड
कँडी क्रश गेम ट्रेंडमध्ये आल्यानंतर ही ऍप जवळपास 30 लाख युजर्सने डाऊनलोड केली. कँडी क्रश सागा ऑफिशियल नावाच्या एका ट्विटर अकाऊंटने दावा केला की, फक्त 3 तासात 30 लाखांहून अधिक लोकांनी ही गेम डाऊनलोड केली. या बनावट अकाऊंटने ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, “भारतीय क्रिकेट दिग्गज धोनीला धन्यवाद. आम्ही फक्त तुमच्यामुळे भारतात ट्रेंड करत आहोत.”

आयपीएल 2024मध्ये दिसणार का धोनी?
एमएस धोनी याने आयपीएल 2023 हंगामाच्या शेवटी म्हटले होते की, जर त्याच्या शरीराने साथ दिली, तर तो आयपीएल 2024 हंगामात खेळताना दिसू शकतो. आता धोनीला पुन्हा आयपीएलमध्ये खेळताना पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. (candy crush download crossed 30 lakh after watching former cricketer ms dhoni viral video of playing game)

महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियात संधी मिळत नसताना रवी बिश्नोईचा मोठा निर्णय, ‘या’ संघासाठी गाजवणार मैदान
“आता हार्दिक भारतासाठी कधीच कसोटी खेळणार नाही”, दिग्गजाने केला मोठा दावा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---