---Advertisement---

…आणि बुमराहला बाद करताच १४५ वर्षांत न झालेला पराक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावे झाला जमा; वाचा सविस्तर

On: शुक्रवार, जानेवारी 14, 2022 1:02 AM
africa-test
---Advertisement---

दक्षिण अफ्रिका विरुद्ध भारत असा तिसरा कसोटी सामना सध्या केपटाऊनमध्ये खेळला जात आहे. उभय संघात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. केपटाऊनमध्ये खेळल्या जाणाऱ्या या शेवटच्या सामन्यात देखील वेगवान गोलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. सामन्याच्या दुसऱ्या डावात अफ्रिकी वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय संघ खूपच कमजोर दिसला. दरम्यान, दक्षिण अफ्रिका संघाने असे काही केले, जे क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात यापूर्वी कधीच घडले नव्हते.

केपटाऊन कसोटीत भारतीय संघ पहिल्या डावात २२३ धावांवर सर्वबाद झाला होता. पहिल्या डावात भारतीय संघाच्या सर्व विकेट्स झेलबाद ठरल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघ १९८ धावांवर गुंडाळला गेला. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात देखील भारताचा संपूर्ण संघ झेलबाद झाला. क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एका कसोटी सामन्यात एखाद्या संघाच्या २० पैकी २० विकेट्स झेलबाद झाल्या. भारतीय संघाच्या या २० झेलपैकी ७ झेल दक्षिण अफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज काइल व्हेरेनने पकडले. व्हेरेनने सामन्याच्या पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात २ झेल पकडले.

दरम्यान, सामन्याचा विचार केला तर भारतीय संघासाठी पहिल्या डावात कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७९ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्या १२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेसाठी पहिल्या डावात कीगन पीटरसनने ९ चौकारांच्या मदतीने ७२ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने स्वतःचे शतक पूर्ण केले. पंतने १३९ चेंडूंचा सामना केला आणि सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद १०० धावा केल्या.

गोलंदाजांमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेतल्या होत्या. तर दक्षिण अफ्रिकेच्या कगिसो रबाडाने पहिल्या डावात सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात मार्को जेन्सनने दक्षिण अफ्रिकेसाठी सर्वोत्तम गोलंदाजी करत चार विकेट्स घेतल्या.

महत्वाच्या बातम्या –

‘त्या’ एका कृतीने रिषभ पंतने करोडो क्रिकेटप्रेमींची मने जिंकली, जगाला दाखवली भारताची संस्कृती

SAvsIND, 3rd Test, Live: तिसऱ्या दिवसाखेर यजमानांची झुंज; भारताच्या विजयाच्या आशा कायम

अहमदाबाद की लखनऊ? कोणत्या संघात खेळणार राशिद?

व्हिडिओ पाहा –

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---