Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘त्या’ एका कृतीने रिषभ पंतने करोडो क्रिकेटप्रेमींची मने जिंकली, जगाला दाखवली भारताची संस्कृती

January 13, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
pant respect bat

Photo Courtesy: Twitter


दक्षिण आफ्रिका आणि भारत (SAvIND) यांच्यादरम्यान केपटाऊन येथे कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची खराब सुरुवात झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली व यष्टीरक्षक रिषभ पंत (Virat Kohli and Rishabh Pant Partnership) यांनी शानदार भागीदारी करत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. सर्व संघ सहकारी बाद होत असताना रिषभ पंतने अखेरपर्यंत नाबाद राहत एक नाबाद विक्रमी शतक ठोकले. या खेळी दरम्यान त्याने केलेल्या एका कृत्यामुळे असंख्य भारतीयांची मने जिंकली. (Rishabh Pant Capetown Century)

मागील वर्षभरापासून बेजबाबदार खेळामुळे रिषभवर सातत्याने टीका होत होती. मात्र, रिषभने या डावात आक्रमण व संयम यांचा सुरेख मेळ साधत एक संस्मरणीय शतक ठोकले. कर्णधार विराट कोहलीसह ९४ धावांची भागीदारी व त्यानंतर तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून भारताला दुसर्‍या डावात आव्हानात्मक धावसंख्या उभारून देताना नाबाद शतकी खेळी केली. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत १०० धावा करत आपल्या कारकिर्दीतील चौथे कसोटी शतक पूर्ण केले. तसेच त्याच्या नावावर या शतकासह अनेक विक्रमही जमा झाले.

रिषभने जिंकली मने
रिषभने या खेळीदरम्यान अनेक मोठे फटके खेळले. कर्णधार विराट कोहली बाद झाल्यानंतर तो आपल्या शतकाच्या दिशेने मार्गक्रमण करत होता. त्यावेळी, रबाडाच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात त्याची बॅट हातातून निसटली. मात्र, त्याने बॅट उचलल्यानंतर त्या बॅटला वंदन करत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. यापूर्वी, टी२० विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध बॅटला पाय लागल्यानंतर त्याने बॅटला वंदन केले होते.

भारतीय संघ सामन्‍यात आघाडीवर
पहिल्या डावात नाममात्र आघाडी मिळाल्यानंतर भारताने दुसर्‍या डावात केएल राहुल, मयंक अगरवाल, अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा हे पहिले चार गडी केवळ ५८ धावांमध्ये गमावले. मात्र, त्यानंतर कर्णधार विराट कोहली पंतने ९४ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. पंतने नाबाद शतकी खेळी केली. भारतीय संघ १९८ धावांवर बाद झाला. दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी २१२ धावा कराव्या लागतील. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने २ बाद १०१ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

पंतास्टिक शो! लाजवाब शतकासह रिषभने लावली विक्रमांची रांग (mahasports.in)

रिषभच्या शतकाने भारावला भारतीय दिग्गज; एक नव्हे दोन ट्विट करत केले कौतुक (mahasports.in)

अहमदाबाद की लखनऊ? कोणत्या संघात खेळणार राशिद? (mahasports.in)


Next Post
eng 2016

इंग्लंडचा सर्वात महत्वपूर्ण खेळाडू 'या' अटीवर नोंदवणार आयपीएलसाठी नाव

Photo Courtesy: Twitter

जिथे कॅमेरा पोहोचेना तिथे पोहोचला पंतचा षटकार आणि सुरु झाली चेंडूची शोधाशोध; पाहा व्हिडिओ

Photo Courtesy: Twitter/IndSuperLeague

चेन्नईयनने हैदराबादला बरोबरीत रोखले

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143