---Advertisement---

केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेची प्रतिष्ठा पणाला! कर्णधार म्हणतोय, ‘१०-१५ वर्षांतील सर्वात मोठा सामना…’

On: मंगळवार, जानेवारी 11, 2022 12:07 PM
Dean Elgar
---Advertisement---

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa)आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ११३ धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता. ही मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे मालिकेतील शेवटचा कसोटी सामना (Sa vs Ind 3rd test) निर्णायक कसोटी सामना असणार आहे. हा सामना केपटाऊनच्या (Cape town) मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने मोठे वक्तव्य केले आहे.

डीन एल्गरने (Dean Elgar) तिसऱ्या कसोटी सामन्याचा पूर्वसंध्येला म्हटले की, “मला नाही वाटत की, मला त्याची कमतरता जाणवली आहे. परंतु, मला असे वाटते की, त्याच्या संघाला त्याची कमतरता नक्की जाणवली असणार. मग ते नेतृत्त्वाच्या बाबतीत असो किंवा रणनिती आखण्याच्या बाबतीत तो एक विश्वस्तरीय खेळाडू आहे, यासह तो भारतीय संघातील अनुभवी खेळाडू आहे. अनेक दिग्गज खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव घेतले जाते. परंतु, खेळत असताना आपण समोर पाहत नाही की, समोर कोण आहे. आपलं लक्ष खेळावर केंद्रित करायला हवं.” (Dean Elgar statement)

हे देखील पाहा – 

१००९ धावा करणारा प्रणव धनावडे आहे तरी कुठे? |  Where is Pranav Dhanawade now

ही मालिका जिंकण्याबाबत डीन एल्गर म्हणाला की, “हा कसोटी सामना गेल्या १० ते १५ वर्षांमध्ये खूप मोठा कसोटी सामना आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला खेळाचा स्तर वाढवावा लागतो आणि तो ५ दिवस टिकून देखील ठेवायचा असतो. मला माहित आहे की ते पाच दिवस टिकवणे नेहमीच शक्य नसते पण तुम्हाला सातत्य राखावे लागेल.”

तसे खेळपट्टी बाबत बोलताना तो म्हणाला की, ” खेळपट्टी चांगली दिसून येत आहे. मी हे देशांतर्गत क्रिकेट सामन्यांच्या आधारे म्हणत आहे. येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यानंतर खेळपट्टीवर भरपूर काम करण्यात आले आहे. त्यांनी चांगली खेळपट्टी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.”

महत्वाच्या बातम्या :

”त्या वरीष्ठ खेळाडूला संघात सामील करण्यास विराटने दिला होता नकार

जाणून घ्या : आयसीसीने डिसेंबरमध्ये एकाही महिला क्रिकेटपटूला ‘प्लेअर ऑफ दि मंथ’ पुरस्काराने का गौरवले नाही?

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---