---Advertisement---

श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर बाबर आझमची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्ही तर सुरुवातीच्या…’

Pakistan-Team
---Advertisement---

पाकिस्तान संघाने मंगळवारी (दि. 10 ऑक्टोबर) वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 8व्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विक्रमी विजय मिळवला. पाकिस्तानने हा सामना 10 चेंडू शिल्लक ठेवून 6 विकेट्सने जिंकला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 344 धावा केल्या होत्या. हे आव्हान पाकिस्तानने 48.2 षटकात 4 विकेट्स गमावत पार केले. हे पाकिस्तानने विश्वचषकाच्या इतिहासात यशस्वीरीत्या पार केलेले सर्वात मोठे आव्हान होते.

हा पाकिस्तानचा वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. बाबर आझम (Babar Azam) याच्या नेतृत्वातील पाकिस्तान (Pakistan) संघ या विजयासह गुणतालिकेत न्यूझीलंडपाठोपाठ दुसऱ्या स्थानी विराजमान झाला.

बाबर आझमने पाकिस्तान संघाच्या विजयाचे श्रेय अब्दुल्लाह शफीक (Abdullah Shafique) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांना दिले. या दोघांनीही शतक झळकावले. शफीकने 103 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 113 धावा केल्या, तर रिझवानने 121 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांची बरसात करत 131 धावा केल्या.

काय म्हणाला बाबर?
सामन्यानंतर बाबरने खेळाडूंचे कौतुक म्हटले, “सर्व खेळाडूंना श्रेय जाते. विशेषत: शफीक आणि रिझवानला. दोघांनी खूपच चांगली भागीदारी रचली आणि श्रीलंकेवर दबाव बनवला. आम्ही सुरुवातीच्या 20-30 षटकात चांगले प्रदर्शन केले नव्हते. याचे संपूर्ण श्रेय कुसल मेंडिस याला जाते. त्याने चांगली खेळी केली.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “या सामन्याचा शेवट चांगला करायचा होता, तेव्हा सर्व गोलंदाजांना श्रेय जाते. अब्दुल्लाह शफीक याच्यासाठी खुश आहे. त्याने चांगला खेळ खेळला. हा त्याचा पहिला विश्वचषक आहे. त्याच्यात खेळण्याची भूक आहे. मी त्याला नेट्समध्ये खेळताना पाहिले आणि सामन्यात घेण्याचा निर्णय घेतला. रिझवान आणि अब्दुल्लाह यांनी ज्याप्रकारे भागीदारी रचली, त्याने आम्हाला खूप मदत झाली. आम्हाला विश्वास होता की, भागीदारी बनेल. हैदराबादच्या प्रेक्षकांचे धन्यवाद, ज्यांनी आमचे सातत्याने समर्थन केले.”

पाकिस्तान संघाचा स्पर्धेतील पुढील सामना 14 ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. (captain babar azam credits abdullah shafique and mohammad rizwan for win against sri lanka cwc 2023)

हेही वाचा-
‘मी ऍक्टिंग करत होतो…’, सामन्यानंतर पाकिस्तानचा मॅचविनर रिझवानचा वेदनेविषयी मोठा गौप्यस्फोट
पाकिस्तानचा रेकॉर्डब्रेक चेज! रिझवान-शफिकने गाठून दिले 345 चे आव्हान, श्रीलंकेचा लाजिरवाणा पराभव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---