ODI World Cup 2023क्रिकेटटॉप बातम्या

‘मी ऍक्टिंग करत होतो…’, सामन्यानंतर पाकिस्तानचा मॅचविनर रिझवानचा वेदनेविषयी मोठा गौप्यस्फोट

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होऊन आता आठवडा होत आला आहे. यादरम्यान झालेल्या 8 सामन्यांमध्ये एकापेक्षा एक विक्रम बनले आणि तुटलेदेखील. असेच काहीसे मंगळवारी (दि. 10 ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात झालेल्या सामन्यादरम्यान घडले. या सामन्यात पाकिस्तानने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. संघाच्या विजयात यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्लाह शफीक यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांनी शतक झळकावले. मात्र, सामना संपल्यानंतर रिझवान याने वेदनेविषयी मोठा गौप्यस्फोट केला. त्याच्या वक्तव्याने खळबळ माजली आहे.

‘कधी वेदना होत्या, कधी ऍक्टिंग करत होतो’- रिझवानची प्रतिक्रिया
मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने भाष्य करताना फलंदाजीवेळी पायाला ताण आल्याच्या समस्येविषयी विधान केले. रिझवानने त्याच्या विधानात पायाला ताण आल्यामुळे फलंदाजी करताना समस्या होत असल्याचे सांगितले. तो असेही म्हणाला की, कधी त्याला वेदना होत होत्या, तर कधी तो ऍक्टिंग करत होता.

https://twitter.com/vinikkohli/status/1711781967195443608

रिझवान म्हणाला, “जेव्हा तुम्ही देशासाठी असे प्रदर्शन करता, तेव्हा नेहमीच तुमच्यााठी अभिमानाचा क्षण असतो. माझ्याकडे सध्या शब्दच नाहीयेत. हे कठीण होते. गोलंदाजी डावानंतर आम्ही परतलो, तेव्हा सर्वांना विश्वास होता की, आम्ही हे आव्हान गाठू शकतो. दुर्दैवाने त्यांनी बाबर आझम याला लवकर बाद केले. मात्र, त्यानंतर आम्ही चांगली भागीदारी केली. ही फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी होती. आम्हाला त्यातून मदत मिळाली. मी शफीकला सांगितले की, टप्प्याटप्प्याने जाऊ.”

वेदनेविषयी बोलताना तो हसत म्हणाला की, “कधी वेदना असतात आणि कधीकधी मी ऍक्टिंग करतो.”

रिझवानचा झंझावात
रिझवान जेव्हा फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता, तेव्हा संघ 37 धावांवर 2 विकेट्स गमावून बसला होता. इथून पुढे रिझवान आणि शफिकने मिळून तिसऱ्या विकेटसाठी 176 धावांची वेगवान भागीदारी रचत संघाचे सामन्यात पुनरागमन करून दिले. रिझवान शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने सामन्यात 121 चेंडूंचा सामना करताना 131 धावांची खेळी साकारली. त्याच्या खेळीत 3 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

पाकिस्तानचा दमदार विजय
या सामन्यात श्रीलंका संघाने निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 344 धावा केल्या होत्या. हे आव्हान पाकिस्तान संघाने 48.2 षटकात 4 विकेट्स गमावून पार केले. अशाप्रकारे पाकिस्तान संघाने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. आतापर्यंत विश्वचषकात खेळलेल्या दोन्ही सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला आहे. आता त्यांना पुढील सामना भारतीय संघाविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडेल. वनडे विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत एकदाही पाकिस्तान संघाला भारताविरुद्ध विजय मिळवता आला नाहीये. (ICC odi world cup 2023 pakistan vs sri lanka mohammad rizwan on his cramps know here)

हेही वाचा-
पाकिस्तानचा रेकॉर्डब्रेक चेज! रिझवान-शफिकने गाठून दिले 345 चे आव्हान, श्रीलंकेचा लाजिरवाणा पराभव
भारत-पाक सामन्यासाठी सुरक्षेचे मजबूत कडे! आर्मी, पोलिस अन् NSG ही तैनात

Related Articles