---Advertisement---

पाकिस्तानचा रेकॉर्डब्रेक चेज! रिझवान-शफिकने गाठून दिले 345 चे आव्हान, श्रीलंकेचा लाजिरवाणा पराभव

---Advertisement---

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील 8 वा सामना खेळला गेला. या सामन्यात मोठी धावसंख्या पहायला मिळाली. श्रीलंका संघासाठी कुसल मेंडीस व सदिरा समरविक्रमा यांनी शतके ठोकत 344 धावा उभारल्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानसाठी अब्दुला शफिक व मोहम्मद रिझवान यांनी शतके झळकावत पाकिस्तानला ही विक्रमी धावसंख्या गाठून दिली. पाकिस्तानचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला.

या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी लंकेकडून सलामीला पथुम निसांका आणि कुसल परेरा उतरले होते. मात्र, डावाच्या दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर हसन अली याने परेराला बाद केले. त्यानंतर कुसल मेंडिस व पथुम निसंका यांनी दुसऱ्या गड्यासाठी 102 धावांची भागीदारी केली. निसंका अर्धशतक करून बाद झाल्यावर सदिरा समरविक्रमा याने मेंडीसला साथ दिली. दोघांनी पुन्हा एकदा शतकी भागीदारी रचली.

यादरम्यान मेंडिसने विश्वचषकातील आपले पहिले शतक पूर्ण केले. त्याने केवळ 77 चेंडूंमध्ये 122 धावांची तुफानी खेळी केली. दुसऱ्या बाजूने सदिरा समरविक्रमा याने देखील आपल्या वनडे कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. बाद होण्यापूर्वी त्याने 89 चेंडूंमध्ये 108 धावा बनवल्या. खालच्या फळीतील फलंदाजांमध्ये इतरांना मोठी धावसंख्या न करता आल्याने श्रीलंकेचा डाव 344 धावांपर्यंत सिमीत राहिला. पाकिस्तानसाठी हसन अली याने सर्वाधिक चार बळी मिळवले.

या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने आपले पहिले दोन बळी लवकर गमावले. दोन बाद 37 अशा स्थितीतून मोहम्मद रिझवान व अब्दुला शफिक यांनी डाव सावरला. शफिकने आपल्या पहिल्याच विश्वचषक सामन्यात 113 धावांची खेळी केली. त्यानंतर रिझवानने सौद शकीलसह पाकिस्तानचा विजय सोपा केला. रिझवानने अखेरपर्यंत नाबाद राहत 131 धावांची खेळी केली. यासह पाकिस्तानने विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा धावांचा यशस्वी पाठलाग करून दाखवला.

(ODI World Cup 2023 Pakistan Beat Srilanka Chase Record 345 Rizwan Shafique Hits Century)

हेही वाचा-
जाळ अन् धूर संगटच! मेंडिसने लंकेकडून पाकिस्तानविरुद्ध ठोकले वर्ल्डकपमधील वेगवान शतक, फक्त…
‘सॉलिड’ समरविक्रमाने झोडली पाकिस्तानची गोलंदाजी, फक्त इतक्या चेंडूवर ठोकले शतक 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---