भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत खेळलेल्या पाचही सामन्यात दणदणीत विजय साकारला आहे. भारताने ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांसारख्या बलाढ्य संघाला मात दिली आहे. भारताने अखेरचा विश्वचषक 2011मध्ये जिंकला होता. तसेच, अखेरची आयसीसी ट्रॉफी 2013मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात जिंकली होती. अशात शानदार प्रदर्शन पाहून भारताला किताबाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. अशात संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याने भारताच्या प्रदर्शनाविषयी मोठे विधान केले आहे.
काय म्हणाला धोनी?
एका कार्यक्रमात एमएस धोनी (MS Dhoni) म्हणाला की, “हा शानदार संघ आहे. संघाचे संतुलन खूपच चांगले आहे. सर्व खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. अशात सर्वकाही चांगले दिसत आहे. मी यापेक्षा जास्त काही बोलणार नाही. शहाण्यांसाठी इशाराच पुरेसा असतो.”
MS Dhoni said – "It's a very good team. The Indian team's balance is extremely good. All the players are playing well in this World Cup. So everything is looking very good. I won't say anything more than this. For the wise, the signal is enough". pic.twitter.com/6HkoQbV5rB
— Tanuj Singh (@ImTanujSingh) October 27, 2023
अशात धोनीच्या या विधानावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, भारतीय संघ पुन्हा एकदा 2011 विश्वचषकाप्रमाणेच कारनामा करू शकतो. विशेष म्हणजे, वनडे विश्वचषक 2011 भारतात खेळवला गेला होता. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंका संघाला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का देत दुसऱ्या वनडे विश्वचषकाची ट्रॉफी आपल्या नावावर केली होती.
धोनीनेच जिंकून दिली अखेरची आयसीसी ट्रॉफ
भारतीय संघाने अखेरचा वनडे विश्वचषक 2011मध्ये एमएस धोनी याच्या नेतृत्वात जिंकला होता. तसेच, संघाने अखेरची आयसीसी ट्रॉफीसुद्धा धोनीच्याच नेतृत्वाखाली 203मध्ये जिंकली होती. त्यावेळी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. धोनीच्या अखेरच्या सामन्याविषयी बोलायचं झालं, तर त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 2019 विश्वचषकातील उपांत्य सामना राहिला होता. त्यावेळी न्यूझीलंडने भारताला 18 धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर धोनी 15 ऑगस्ट, 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. मात्र, तो आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. त्याने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल 2023 हंगामाचे किताब जिंकून दिले आहे. हा सीएसकेचा पाचवा आयपीएल किताब आहे.
रोहित शर्मा विश्वचषकात पहिल्यांदाच करतोय नेतृत्व
दुसरीकडे रोहित शर्मा पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत आहे. अशात त्याचे एकच ध्येय आहे, ते म्हणजे संघाला ट्रॉफी जिंकून देणे. वयाचा विचार केला, तर रोहित (36) आणि विराट कोहली (34) यांचा हा अंतिम विश्वचषक असू शकतो. मागील महिन्यात आशिया चषक 2023 स्पर्धेचा किताबही भारताने जिंकला आहे. अशात भारतीय संघ आपले हे शानदार प्रदर्शन कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. (captain cool ms dhoni opens up on team india chances of winning world cup title rohit sharma world cup 2023)
हेही वाचा-
छोटेखानी खेळीत रिझवानचा मोठा पराक्रम, वनडे करिअरमध्ये पार केला मैलाचा दगड; वाचा बातमी
आता बाबरला रोखणं कठीण! विश्वचषकातील तिसरं अर्धशतक ठोकत दिले फॉर्मात परतल्याचे संकेत