दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आलेल्या आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. गतविजेत्या बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला. तसेच, विश्वचषक जिंकण्याच्या स्वप्नांचा चुराडा केला. हा सामना ऑस्ट्रेलियाने अवघ्या 5 धावांच्या फरकाने खिशात घातला. या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर झुंज देत खेळत होती, पण तिचे अर्धशतक व्यर्थ ठरले. परंतु भारतीय कर्णधार विश्वचषकात अर्धशतक करून धावबाद होण्याची ही पहिली वेळ नव्हती.
ऑस्ट्रेलिया महिला (Australia Women) संघाची कर्णधार मेग लॅनिंग (Meg Lanning) हिने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करताना 4 विकेट्स गमावत 172 धावांचे आव्हान उभे केले होते. हे आव्हान पार करताना भारतीय महिला (India Women) संघाला यश आले नाही. त्यांनी यावेळी 8 विकेट्स गमावत फक्त 167 धावाच केल्या.
एमएस धोनीप्रमाणेच हरमनही झाली बाद
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांच्यात अनेक गोष्टींचे साम्य पाहायला मिळते. दोघेही भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसले. दोघांनाही पॉवर हिटर म्हटले जाते. दोघेही सामना विजयाच्या जवळ नेऊन संपवण्याची क्षमता राखतात. विशेष म्हणजे, एमएस धोनी आणि हरमनप्रीत कौर (MS Dhoni And Harmanpreet Kaur) यांच्या जर्सीचा नंबरही 7 आहे.
FIFTY!@msdhoni in 2019
Matches: 3 ✔️
50s: 3✔️
Average: 150 plus✔️#AUSvIND #TeamIndia pic.twitter.com/uyJQAvmKe7— BCCI (@BCCI) January 18, 2019
आता या गोष्टींवरून अनेकांना क्रिकेट चाहत्यांना आनंद होईल, परंतु एक गोष्ट अशीये ज्याने दुसऱ्या क्षणाला वाईटही वाटेल. ती गोष्ट म्हणजे, एमएस धोनीही आयसीसी वनडे विश्वचषक 2019 (ODI World Cup 2019) स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध धावबाद होऊन तंबूत परतला होता. त्यामुळे भारताला पराभवाचा धक्का बसला होता. आता महिला टी20 विश्वचषक 2023 (Womens T20 World Cup 2023) स्पर्धेतही हरमनप्रीत धावबाद होऊन तंबूत परतली आणि संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तिने या सामन्यात 34 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 52 धावांचे योगदान दिले होते.
Finest of margins.#T20WorldCup pic.twitter.com/oU6oTIGx2j
— ICC (@ICC) February 23, 2023
Captain @ImHarmanpreet leading from the front 🫡🫡
Brings up a brilliant FIFTY off 32 deliveries.
Live – https://t.co/fVVsNjFbjU #INDvAUS #T20WorldCup pic.twitter.com/HD3YFhvhxy
— BCCI Women (@BCCIWomen) February 23, 2023
वनडे विश्वचषक 2019मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघ उपांत्य सामन्यात (Semi Final) आमने-सामने होते. या सामन्यात धावबाद झाल्यानंतर परत कधीच भारताकडून मैदानावर खेळण्यासाठी उतरला नाही. 7 क्रमांकाची जर्सी पुरुष क्रिकेटमध्ये पुन्हा मैदानावर भारताकडून कधीच दिसली नाही. हरमनप्रीतनेही महिला क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, धोनीप्रमाणेच तिच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा शेवट होणार नाही अशी चाहत्यांना आशा आहे. (captain harmanpreet kaur get runout in semifinal ms dhoni also got run out in world cup 2019 semi final both have jersey number 7)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सेमीफायनलच्या एक दिवस आधीच बिघडलेली हरमनची तब्येत; कांगारूंचा धाडसाने सामना करत जिंकली सर्वांची मने
अश्रू लपवण्यासाठी हरमनने लावला चष्मा, पण चेहऱ्यावर दिसल्या वेदना; म्हणाली, ‘माझ्या देशाने मला रडताना…’