---Advertisement---

Mi vs PBKS: कर्णधार श्रेयसच्या सर्वोत्तम खेळीमुळे 11 वर्षांनंतर पंजाब फायनलमध्ये, मुंबईचं स्वप्न भंगल!

On: सोमवार, जून 2, 2025 7:45 AM
---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025) पंजाब किंग्सने क्वालिफायर 2(qualifier 2) सामन्यात मुंबईचा शानदार पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. कर्णधार श्रेयसच्या (shreyas iyer) शानदार खेळीने पंजाबने अकरा वर्षांनंतर फायनलमध्ये एन्ट्री केली आहे (punjab kings now into the final). प्रथम मुंबईने फलंदाजी करत 204 धावांचं आव्हान पंजाब समोर ठेवलं होतं. कर्णधार अय्यरने जबरदस्त फलंदाजी करत 41 चेंडूत 87 धावांची नाबाद खेळी केली. 19 व्या शतकात अश्वनी कुमार (Ashwani Kumar) विरुद्ध 4 षटकार झळकावत पंजाबला फायनल तिकीट मिळवून दिले. श्रेयस शिवाय नेहाल वडेराने (nehal vadhera) सुद्धा 29 चेंडू 48 धावा केल्या. जोश इंग्लिशने (josh English) सुद्धा 38 धावा केल्या

204 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. प्रभसिमरन सिंग (prabhsimran singh) 9 चेंडूचा सामना करत असताना 6 धावांवर बाद झाला. प्रियांश (priyansh aarya) आणि जोश इंग्लिशने (josh English) 42 धावांची भागीदारी केली. या दरम्यान त्यांनी 5 चौकार आणि 2 षटकार झटकावले. जोश इंग्लिश परत गेल्यानंतर श्रेयस आणि नेहाल वढेराने संघाला सांभाळले, दोघांनी मिळून 47 चेंडूत 84 धावांची भागीदारी केली.

श्रेयसने महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार पारी खेळली, त्याने नाबाद 87 धावा केल्या. मुंबईच्या गोलंदाजांना त्याने चांगलाच त्रास दिला. 41 चेंडूंचा सामना करत त्याने 87 धावा केल्या, आता अंतिम सामन्यात पंजाबचा सामना 3 जून रोजी आरसीबी विरुद्ध होणार आहे. (Punjab kings vs mumbai indians)

टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबईने सुरुवात चांगली केली नाही. त्यानंतर जॉनी बेयरस्टो jonny Bairstow) आणि तिलक वर्माने (Tilak verma) चांगली भागीदारी रचली. बेयरस्टोने 38 तसेच तिलक वर्माने 44 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने (suryakumar yadav) देखील 44 धावा केल्या. यादरम्यान त्याने एबी डिव्हिलियर्सचा एक मोठा विक्रम मागे टाकला. त्याचबरोबर नमन धीरने देखील मुंबईसाठी शानदार पारी खेळली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---