---Advertisement---

भारतीय संघाला घाम फोडणाऱ्या ‘त्या’ दोघांना कमिन्सने दिले विजयाचे श्रेय; म्हणाला, ‘त्यांच्यामुळे…’

On: गुरूवार, सप्टेंबर 28, 2023 10:35 AM
Pat-Cummins
---Advertisement---

भारतीय संघाविरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांवर ऑस्ट्रेलिया संघाला पाणी फेरावे लागले होते. मात्र, तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने दमदार पुनरागमन केले. तसेच, भारतीय संघाविरुद्ध 66 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने आपल्या दोन धुरंधरांसाठी कौतुकाचे पूल बांधले. चला तर, कमिन्स नेमका काय म्हणाला, जाणून घेऊयात…

नाणेफेकीसह सामनाही खिशात
राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवरील या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकली होती. तसेच, त्याने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पाहुण्या संघाने निर्धारित 50 षटकात 7 विकेट्स गमावत 352 धावांचा पाऊस पाडला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 49.4 षटकात 10 विकेट्स गमावत 286 धावाच करू शकला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने हा सामना 66 धावांनी जिंकला. तसेच, 1-2ने व्हाईटवॉश टाळला.

खेळाडूंचे कौतुक
भारताविरुद्धच्या विजयानंतर कमिन्सने आपल्या संघाच्या खेळाडूंना प्रोत्साहन दिले. या सामन्यात ऑस्ट्रेलिया खेळाडू चमकदार कामगिरी करताना दिसले. मिचेल स्टार्क याने शानदार गोलंदाजी केली. तसेच, डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी धमाकेदार फलंदाजी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. यामुळे कर्णधार खूपच खुश झाला. त्याने सामन्यानंतर खेळाडूंचे कौतुक केले.

तो म्हणाला, “स्टार्क आणि मॅक्सवेल यांच्यासाठी हे चांगले पुनरागमन आहे. दोघांनी मागील काही महिन्यांपासून क्रिकेट सामना खेळला नव्हता. मॅक्सवेलने 4 विकेट्स घेतल्या. तसेच, स्टार्कही चांगल्या लयीत दिसला होता. मी या प्रदर्शनाने खूपच खुश आहे. ट्रेविस हेड विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये फिट नसेल. त्यामुळे मिचेल मार्श आमच्यासाठी सलामीला खेळेल. आज ज्याप्रकारे मॅक्सवेल आणि वॉर्नरने खेळ दाखवला, ते खूपच खतरनाक सलामी फलंदाजांपैकी एक आहेत.”

कमिन्सचे बॅट आणि चेंडूतून महत्त्वाचे योगदान
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात चमकदार कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो. या सामन्यातही त्याने तसेच केले. त्याने आधी फलंदाजी करताना 22 चेंडूत 19 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्यानंतर गोलंदाजीत त्याने 8 षटके टाकताना 1 विकेटही नावावर केली. (captain pat cummins credit this two cricketers after win against india in 3rd odi)

हेही वाचा-
‘इथल्या लोकांनी आमचे…’, विश्वचषकासाठी भारतात दाखल झाल्यानंतर बाबर आणि रिझवानची लक्षवेधी प्रतिक्रिया
CWC23: तब्बल 7 वर्षांनंतर पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात दाखल, हैदराबाद विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---