आगामी बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळली जाणार आहे. दोन्ही संघामध्ये सामन्यादरम्यान चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू या स्पर्धेची आपुलकीने वाट पाहताना दिसत आहेत. भारताने ऑस्ट्रेलियाला मायदेशात कसोटी मालिकेत दोनदा पराभूत केले आहे. तत्पूर्वी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी कमिन्सने भारतीय संघाला इशारा दिला आहे. तो म्हणाला की, “आता बदला घेण्याची वेळ आली आहे.”
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना पॅट कमिन्स (Pat Cummins) म्हणाला की, “ऑस्ट्रेलियात झालेल्या दोन कसोटी मालिकेत आम्हाला यश आले नाही. त्यामुळे आम्हाला जिंकून खूप दिवस झाले. यावेळी नुकसान भरपाई वसूल होईल, अशी आशा आहे. आमच्यामध्ये असे अनेक सामने झाले आहेत, त्यामध्ये भारताने आम्हाला पराभूत केले. पण असे अनेकवेळा घडले आहे, जेव्हा आम्ही त्यांच्याविरुद्ध जिंकलो आहोत, तेव्हा आम्हाला आत्मविश्वास भेटला आहे.”
पुढे बोलताना कमिन्स म्हणाला, “गेल्या दोन वेळा आम्हाला कसोटी मालिकेत भारताला हरवता आले नाही. आम्ही भारत दौऱ्यावर असतानाही ते चांगले क्रिकेट खेळले. भारताला घरच्या मैदानावर पराभूत करणे खूप कठीण आहे हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा मोठा हंगाम आहे. मी खूप उत्सुक आहे आणि हो, मी त्याची आतुरतेने वाट पाहत आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
बांग्लादेशच्या मालिका विजयांनतर WTC गुणतालिकेत फेरबदल; भारताला राहावं लागणार सावध!
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ‘या’ गोलंदाजाने एकाच षटकात दिल्या सर्वाधिक धावा
ठरलं…!!! ‘या’ दिवशी होणार WTCचा फायनल सामना, आयसीसीने केली घोषणा