आज आयपीएलमधील सनरायर्झ हैद्राबाद संघाने कर्णधारपदी केन विल्यमसनची नियुक्ती केली. चेंडू छेडछाड प्रकरणानतंर डेव्हिड वॉर्नरने हैद्राबाद संघाचे कर्णधारपद काल सोडले आहे तर स्मिथने राजस्थान संघाचे कर्णधारपद यापुर्वीच सोडले आहे.
यामुळे आयपीएलमधील कोणत्या संघाचा कर्णधार कोण असणार हे चित्र आज स्पष्ट झाले आहे.
आयपीएलच्या 11 व्या हंगामाला 7 एप्रिल पासून सुरूवात होत आहे. यामध्ये आठ संघांचा सहभाग आहे. यातील 7 संघाचे कर्णधार हे भारतीय असून केन विल्यमसन हा एकमेव विदेशी कर्णधार आहे.
यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कर्णधारांपैकी रॉयल चॅलेजर्स बेंगलोरचा विराट कोहलीला 17 कोटी एवढी मोठी रक्कम मिळाली तर दिल्ली डेयरडेविल्सचा गौतम गंभीरला फक्त 2.8 कोटी रक्कम मिळाली.
एकप्रकारे विराट हा या आयपीएलमधील सर्वात महागडा कर्णधार ठरला आहे. सर्वात कमी रक्कम मिळालेल्या गौतम गंभीरपेक्षा विराटला तब्बल ६ पट जास्त रक्कम मिळाली आहे.
आयपीएलच्या कर्णधारांना मिळाली एवढी रक्कम –
1) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहली ( 17 कोटी )
2) चेन्नई सुपरकिंग्ज – एमएस धोनी ( 15 कोटी )
3) मुबंई इंडीयन्स – रोहीत शर्मा ( 15 कोटी )
4) किंग्ज इलेवन पंजाब – आर अश्विन ( 7.6 कोटी )
5) कलकत्ता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक ( 7.4 कोटी )
6) राजस्थान रॉयल – अजिंक्य रहाणे ( 4 कोटी )
7) सनरायजर्स हैजराबाद –केन विलीयमसन ( 3 कोटी )
8) दिल्ली डेयरडेविल्स – गौतम गंभीर ( 2.8 कोटी )