रोहित शर्मा- भारतीय संघाचा कर्णधार सध्या गंभीर संकटात आहे. पुल शॉटचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या धावांची संधी गमावत आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात फक्त 2 धावा काढून तो बाद झाला, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याची कामगिरी निराशाजनक होती.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा मोठी खेळी खेळू शकला नाही. त्याने 7 चेंडूत फक्त दोन धावा करून बाद झाला. रोहित गोलंदाज साकिब महमूदचा बळी ठरला. याआधी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही तो त्याच्या नावाप्रमाणे कामगिरी करू शकला नव्हता. ज्यात तो त्याच्या मुलाच्या जन्मामुळे पहिल्या कसोटी सामन्यात खेळला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तीन सामन्यांमध्ये तो फक्त 31 धावा करू शकला. शेवटच्या सामन्यात त्याने स्वतःला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले. त्याच्या खराब फॉर्मवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. शिवाय टीम इंडियाला ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत 1-3 ने पराभव स्वीकाराव लागला.
यानंतर, बीसीसीआयने केंद्रीय कराराखाली करारबद्ध खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य केले. यानंतर रोहितने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई संघाकडून एक सामना खेळला. पण तिथेही त्याची बॅट शांत राहिली. त्याने तीन आणि 28 धावा केल्या. आता तो एकदिवसीय क्रिकेटमध्येही फ्लाॅप ठरला आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तो फॉर्ममध्ये नसेल, तर टीम इंडियासाठी हे एका मोठ्या डोकेदुखीपेक्षा कमी नाही. कारण त्याची गणना मोठ्या खेळाडूंमध्ये केली जाते आणि त्याची कामगिरी खूप महत्त्वाची आहे.
रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील गेल्या 16 डावांमध्ये फक्त 166 धावा करता आल्या आहेत. ज्यामध्ये फक्त एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याच्या नावाचा विचार करता ही कामगिरी खूपच खराब आहे. भारतीय चाहते आणि संघ व्यवस्थापनाला आशा असेल की तो पुढील दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये मोठी खेळी करेल. जेणेकरून संघ व्यवस्थापनाचा ताण कमी होईल.
हेही वाचा-
नागपूरचा वनडे सामना भारताच्या नावे, इंग्लंडचा दारुण पराभव, गिल-अय्यरची निर्णायक खेळी
IND vs ENG; श्रेयस अय्यरची वादळी अर्धशतकी खेळी, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आनंदाची बातमी
दु:खद बातमी.! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे 74 व्या वर्षी निधन






