तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत भारतीय संघाने श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला आहे. अशाप्रकारे भारतीय संघाने खेळलेल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये सलग १२ वा विजय मिळवला आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघाने घरच्या मैदानावर दोन महिन्यांच्या आतच दोन संघांविरुद्ध सलग २ मालिका खिशात घातल्या आहेत. रविवारी (२७ फेब्रुवारी) धरमशाला येथील मैदानावर खेळण्यात आलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला ६ विकेट्सने पराभूत केले होते. यानंतर भारतीय खेळाडूंनी विजयाच्या ट्रॉफीसोबत फोटोही काढले.
कर्णधार रोहितने एमएस धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहलीची (Virat Kohli) परंपरा कायम ठेवत युवा खेळाडू रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) आणि आवेश खान (Avesh Khan) यांना ट्रॉफी सोपवली. मात्र, या खेळाडूंनी ट्रॉफी देण्यापूर्वी रोहितने खेळाडूला नाही, तर संघाशी निगडीत एका व्यक्तीला ही ट्रॉफी सोपवली होती. कोण होता तो व्यक्ती चला जाणून घेऊया…
मालिका जिंकल्यानंतर रोहितने कोणत्याही खेळाडूला नाही, तर जयदेव शाहला (Jaydev Shah) ट्रॉफी सोपवली होती. सामन्यानंतर जयदेव शाहला ट्रॉफी देताच रोहितचा एक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे होते की, नेमका हा व्यक्ती कोण आहे, ज्याला भारतीय कर्णधाराने ट्रॉफी सोपवली?
So good to see rohit running towards jaydev shah a fellow ranji trophy cricketer and now an administrator and handing him the trophy and asking him to join the boys. pic.twitter.com/TgvdBskYOI
— scorpio682 (@sourabhdaga82) February 28, 2022
जयदेव शाहबद्दल बोलायचं झालं, तर तो भारतीय क्रिकेट संघाचा नवीन व्यवस्थापक आहे. याव्यतिरिक्त त्याची दुसरी ओळख म्हणजे, तो सौराष्ट्र संघाचा माजी कर्णधारही आहे. जयदेव हा बीसीसीयचे माजी सचिव निरंजन शाह यांचा मुलगा आहे. तो भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेदरम्यान बीसीसीआयचा प्रतिनिधीच्या भूमिकेत आहे. प्रत्येक मालिका, स्पर्धा किंवा सामन्यात बोर्डाचा एक अधिकारी नेहमीच भारतीय संघासोबत असतो, जो व्यवस्थापक देखील असतो.
जयदेवने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. त्याने १२० सामने खेळताना २९.९१ च्या सरासरीने ५३५४ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १० शतके आणि २० अर्धशतकांचा पाऊसही पाडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-