---Advertisement---

IND vs NZ; 46 धावात सर्वबाद झाल्यानंतर भारतीय कर्णधार म्हणाला, “आमचा निर्णय चुकीचा…”

On: गुरूवार, ऑक्टोबर 17, 2024 8:51 PM
---Advertisement---

सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला कसोटी सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगला आहे. तत्पूर्वी या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला न्यूझीलंडने  केवळ 46 धावात गारद केले. यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 3 गडी गमावून 180 धावा केल्या. पण दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला, “आम्हाला वाटले की पहिल्या सत्रानंतर ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना जास्त मदत करणार नाही कारण तिथे जास्त गवत नाही. आम्हाला वाटले की खेळपट्टी सपाट असेल. त्यामुळे आमचा हा निर्णय चुकीचा होता आणि मला खेळपट्टी नीट वाचता आली नाही.”

भारताने केलेल्या 46 धावांना प्रत्युत्तर देताना पाहुण्या संघाने 3 गडी गमावून 180 धावा केल्या आहेत. न्यूझीलंड आता 134 धावांनी पुढे आहे. न्यूझीलंडसाठी डेव्हाॅन कॉनवेने (Devon Conway) भारतीय गोलंदाजांविरुद्ध वेगवान धावा केल्या. कॉनवेने 105 चेंडूत 11 चौकारांसह 3 षटकार ठोकले. दरम्यान त्याने सर्वाधिक 91 धावा केल्या. तर भारताच्या रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या तिन्ही फिरकीपटूंनी भारतासाठी आतापर्यंत 1-1 विकेट मिळवली. याआधी न्यूझीलंडकडून मॅट हेनरीने सर्वाधिक 5 विकेट्स, तर विल्यम ओ रुकीने 4 विकेट्स घेतल्या.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग 11-

न्यूझीलंड- टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हाॅन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मॅट हेनरी, टिम साउथी, एजाज पटेल, विल्यम ओरोरके

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs NZ; 91 वर्षांनंतर भारताच्या नावावर झाला ‘हा’ खराब रेकाॅर्ड
IPL 2025; आगामी हंगामापूर्वीच गांगुलीला मिळाली मोठी जबाबदारी, ‘या’ भूमिकेत दिसणार
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा स्टंपिंग करणारे टाॅप-5 खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---