सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाला वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषकात उतरणार आहे. कर्णधार म्हणून रोहितचा हा पहिलाच विश्वचषक आहे. विशेष म्हणजे, या विश्वचषकापूर्वी रोहितने 2011 विश्वचषक स्पर्धेची आठवण काढली आहे. त्याने म्हटले आहे की, जेव्हा त्याला 2011च्या विश्वचषक संघातून वगळले होते, तेव्हा त्याने विचार केला नव्हता की, तो पुढील विश्वचषक खेळू शकेल. त्याच्या मते, खेळ अशी गोष्ट आहे, ज्यात तुम्ही कधीही पुनरागमन करू शकता.
विश्वचषक 2011मध्ये नव्हती मिळाली संघात जागा
रोहित शर्मा 2011 विश्वचषक (Rohit Sharma 2011 World Cup) स्पर्धेत भारतीय संघाचा भाग नव्हता. रोहितला संघात सामील करण्याची शक्यता होती, पण तसे काहीच झाले नाही. मात्र, यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आतापर्यंत दोन विश्वचषक खेळला आहे. त्यात 2015 आणि 2019च्या विश्वचषकाचा समावेश आहे. आता विश्वचषक 2023 (World Cup 2023) हा त्याचा तिसरा विश्वचषक असणार आहे. यावेळी तो फक्त खेळाडू म्हणून नाही, तर कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे.
रोहितची प्रतिक्रिया
रोहित शर्मा याने याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने एका युट्यूब चॅनेलशी बोलताना म्हटले की, “खेळात सर्वात चांगली बाब अशी असते की, तुम्ही नेहमी पुनरागमन करू शकता. तुम्ही कशाही स्थितीत का असेना, पण पुनरागमनाची संधी असते. जेव्हा मी 2011 विश्वचषक संघातून वगळलो गेलो होतो, तेव्हा मला माहिती नव्हते की, यापुढील विश्वचषकात खेळू शकेल की नाही. मात्र, हा आता माझा तिसरा विश्वचषक आहे.”
पुढे बोलताना रोहित म्हणाला, “जगात बऱ्याच गोष्टी अशक्य वाटतात, पण त्या शक्य करण्यासाठी तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे. मी जेव्हा 2011च्या यादीत निवडलो गेलो नव्हतो, तेव्हा निश्चितच निराश झालो होतो आणि आता काय करायचे, हे मला माहिती नव्हते. मात्र, बरेच असे उदाहरण आहेत, जेव्हा खेळाडूंची निवड विश्वचषकात झाली नाही, पण नंतर त्यांची कारकीर्द चांगल्याप्रकारे पुढे गेली.”
भारताचा पहिला सामना
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नई येथे होणार आहे. यानंतर भारत 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तान आणि 14 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भिडताना दिसेल. (captain rohit sharma opens up on not being selected in world cup 2011 team)
महत्त्वाच्या बातम्या-
‘धोनीने एकट्याने वर्ल्डकप…’, डिविलियर्सचं हैराण करणारं विधान वेधतंय सर्वांच लक्ष
सजवलेल्या बसमधून निघणार World Cup Trophyची पुण्यात भव्य रॅली; कधी, कुठे आणि कशी जाणार? घ्या जाणून