---Advertisement---

कर्णधार रोहित शर्मा म्हणतोय, ‘आत्तापर्यंत आम्ही २७ खेळाडूंना आजमावले आणि अजून…’

Rohit-Sharma-Rahul-Dravid
---Advertisement---

कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने शनिवारी (२६ जानेवारी) श्रीलंकेविरुद्धच्या दुसरा टी-२० सामना ७ विकेट्सने जिंकला. या विजयानंतर भारताने मालिकेत (IND vs SL 2nd T20I) २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा जेव्हापासून कर्णधार बनला आहे, तेव्हापासून भारतीय संघ सतत चांगले प्रदर्शन करत आहे आणि संघात अनेक युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली आहे. शनिवारी विजय मिळवल्यानंतर रोहिने यासंदर्भात महत्वाचे संकेत दिले आहेत. 

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यातील विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला की, “विजयात मधल्या फळीचे महत्वाचे योगदान राहिले. अशाप्रकारची भागीदारी पाहणे चांगले होते. मागच्या काही सामन्यांमध्ये हे अनेकदा झाले आहे. काही षटकांमध्ये (पॉवर प्ले) गोलंदाजी चांगली झाली. आम्ही विरोधी संघातील फलंदाजांना धावा करण्यापासून रोखले. शेवटच्या ५ षटकांमध्ये जास्त धावा गेल्या. ही गोष्ट अशी आहे, जी आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. परंतु आम्ही चांगले प्रदर्शन केले.”

युवा आणि नवीन खेळाडूंना संधी देण्याविषयी रोहित म्हणाला की, “फलंदाजांमध्ये आमच्याकडे खूप प्रतिभा आहे. आम्ही संधी देत राहू. याचा जास्तीत जास्त लाभ घेणे त्यांच्यावर (फलंदाजांवर) अवलंबून आहे. संजूने (सॅमसन) दाखवले की, तो किती चांगला खेळू शकतो. हे सर्व तुम्ही संधीचा फायदा घेण्याविषयी आहे. यामध्ये अनेक खेळाडू खूप प्रतिभाशाली आहेत. त्यांना फक्त तिथे जाणे आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी हवी आहे.”

“खूपजण संधीची वाट पाहत आहेत, त्यांचीही वेळ येईल. आम्हाला त्यांचाही विचार करावा लागेल, जे काही काळापासून संघातून आत बाहेर होत आहेत. आम्ही समजू शकतो की, त्या सर्वांमध्ये खूप प्रतिभा आहे. हा फक्त संधी देणे आणि आमच्याकडून मिळणाऱ्या समर्थनाचा विषय आहे.”

श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्याविषयी बोलताना रोहित म्हणाला, “आम्ही उद्या (रविवारी) बसू आणि पाहू की काय करता येईल. आम्ही आतापर्यंत २७ खेळाडूंचा आजमावले आहे आणि अजूनही बदल होऊ शकतात. जेव्हा तुम्ही मालिका जिंकता तेव्हा, असे खेळाडू असतात ज्यांना संधी मिळाली नसते. काही खेळाडूंना कसोटी खेळावी लागेल. आम्हाला सर्वांचा विचार करावा लागेल. शारीरिक रूपाने तयार राहणे योग्य राहिले, पण हा मानसिक मुद्दाही आहे, जो महत्वाचा आहे. शेवटी आम्हाला जिंकत राहणे आणि सकारात्मक ऊर्जा कायम ठेवण्याची गरज आहे.”

दरम्यान, श्रीलंकेविरुद्धचा दुसरा टी-२० सामना जिंकण्यासाठी श्रेयस अय्यरने महत्वाचे योगदान दिले. त्याने सर्वाधिक ७४ धावा केल्या आणि यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले. त्याव्यतिरिक्त रवींद्र जडेजा ४५ आणि संजू सॅमसनच्या ३९ धावांचे योगदानही महत्वाचे ठरले.

महत्वाच्या बातम्या –

भारताने पाकिस्तानच्या ‘या’ विश्वविक्रमाची बरोबरी तर केली, आता कट्टर प्रतिस्पर्ध्यांना पछाडण्याची संधी

मायदेशात विजय मिळवण्यात कर्णधार रोहित ‘नंबर वन’! ‘इतक्या’ विजयांसह मॉर्गन-विलियम्सनला टाकले मागे

‘हिटमॅन’ला १ धावेवर बाद करताच दुष्मंता चमीराच्या नावावर खास विक्रम; बोल्ट अन् साऊदीलाही पछाडलं

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---