बलाढ्य भारतीय संघ आशिया चषक 2023 स्पर्धेचा विजेता ठरला. रविवारी (दि. 17 सप्टेंबर) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 10 विकेट्सने पराभव केला. तसेच, भारताने 8व्यांदा आशिया चषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारताच्या तयारीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, पण आता भारतीय संघाने त्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. भारताने एकतर्फी सामना जिंकत विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी सर्व संघांना चेतावणी दिली आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सुपर- 4 फेरीत पाकिस्तानविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला होता. तशीच कामगिरी भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध केली.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेला अवघ्या 50 धावांवर सर्वबाद केले. यावेळी भारताकडून मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने सर्वोत्तम गोलंदाजी करत 6 विकेट्स घेतले. तसेच, त्यानंतर फलंदाजी करताना 10 विकेट्सने सामना जिंकला. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा आनंद गगनात मावेनासा झाला. विजयानंतर रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली. त्याने यावेळी सिराज ते शुबमन गिल सर्वांचे कौतुक केले.
भारताच्या शानदार प्रदर्शनानंतर रोहित म्हणाला, “हे खूपच शानदार प्रदर्शन होते. अंतिम सामन्यात अशाप्रकारे खेळणे संघाची मानसिकता दाखवते. आज चेंडूने कमालीची सुरुवात झाली आणि नंतर फलंदाजीने सामना चांगल्याप्रकारे संपवला गेला. मी स्लिपमध्ये उभा होतो, ज्यामुळे आम्हाला अभिमान वाटत होता. आमच्या वेगवान गोलंदाजांनी खूपच मेहनत घेतली आहे. ते आपल्या निर्णयावर ठाम राहतात. हे पाहून चांगले वाटले. असे प्रदर्शन खूप काळ लक्षात राहते. मी विचार केला नव्हता की, इतके चांगले प्रदर्शन होईल.”
सिराजचे गोडवे गाताना रोहित म्हणाला, “सिराजला याचे श्रेय जाते. खूप कमी वेगवान गोलंदाज असे असतात, जे खेळपट्टीतूनही आणि हवेतूनही चेंडू स्विंग करू शकतात. याव्यतिरिक्त संघातील इतर खेळाडूंनीही वेगवेगळ्या टप्प्यात आपले काम चांगल्याप्रकारे केले. त्या सर्वांनी आपापल्या भूमिका निभावल्या.”
𝙒𝙃𝘼𝙏. 𝘼. 𝙒𝙄𝙉! 😎
A clinical show in the summit clash! 👌👌
A resounding 10-wicket win to clinch the #AsiaCup2023 title 👏👏
Well done, #TeamIndia! 🇮🇳#INDvSL pic.twitter.com/M9HnJcVOGR
— BCCI (@BCCI) September 17, 2023
“आम्हाला या मालिकेतून खूप सकारात्मक गोष्टी मिळाल्या आहेत. अशा आत्मविश्वासासोबत पुढे जाणे चांगले आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध आम्ही दबावात होतो आणि 4 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, नंतर हार्दिक आणि इशान यांनी दबावात फलंदाजी करून आम्हाला चांगली धावसंख्या मिळवून दिली. त्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहलीचे शतक पाहणे शानदार होते. शुबमन गिलही शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याच्यात फलंदाजीचा किडा आहे. त्याला फलंदाजी करत राहणे आवडते. ही गोष्टी आमच्या संघासाठी चांगलं काम करते. अनेक खेळाडूंनी वेगवेगळ्या टप्प्यात संघाला दबावाच्या स्थितीतून बाहेर काढले आहे.”
सिराजने या सामन्यात 7 षटके गोलंदाजी करताना फक्त 21 धावा खर्च करून सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. त्याने डावातील चौथ्या षटकातच 4 विकेट्स घेण्याचा कारनामाही केला. त्याच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या यानेही 3 विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह याने 1 विकेट नावावर केली.
आता भारतीय संघ (Team India) 5 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 22 ते 27 सप्टेंबरदरम्यान 3 सामन्यांची वनडे मालिका खेळेल. त्यानंतर विश्वचषकातील पहिला सामनाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी खेळेल. (captain rohit sharma said it was a great performance after beating sri lanka in asia cup 2023 final)
महत्वाच्या बातम्या-
यहाँ के हम सिकंदर! भारत बनला सर्वाधिक Asia Cup ट्रॉफी जिंकणारा संघ; पाकिस्तान तळाशी, Winners List
टीम इंडिया आशियाई क्रिकेटची सरताज! श्रीलंकेला नमवत 8 व्यांदा जिंकला आशिया कप