आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 12व्या सामन्यात शनिवारी (दि. 14 ऑक्टोबर) कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आमने-सामने आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा महामुकाबला खेळला जाईल. या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंवर मोठा दबाव असेल. जो संघ हा दबाव झेलण्यात यशस्वी ठरेल, तो विजेता बनेल. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा प्रयत्न वनडे विश्वचषकात पाकिस्तानला सलग 8व्यांदा पराभूत करणे असेल. खरं तर, वनडे विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 7 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यात प्रत्येक वेळी भारताने विजय मिळवला आहे. अशात रोहितने सामन्यापूर्वी मोठे विधान केले.
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील दोन्ही संघांविषयी बोलायचं झालं, तर दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. भारतीय संघाने सुरुवातीच्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघाचा पराभव केला आहे. तसेच, बाबर आझम (Babar Azam) याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघानेही शानदार प्रदर्शन करत सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने नेदरलँड आणि श्रीलका संघाला पराभूत केले आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने मायदेशातील प्रेक्षकांपुढे खेळण्याचा अनुभव शेअर केला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित म्हणाला, “घरच्या चाहत्यांपुढे खेळण्यात कुठलेही नुकसान नाहीये. हे चाहते स्थिती तुमच्या बाजूने नसतानाही तुमची साथ देतात. आपण कुठेही जातो, तेव्हा प्रेक्षकांचा पाठिंबा मिळतो. मी याकडे मोठ्या फायद्याच्या रूपात पाहतो. हे तुम्हाला क्रिकेट खेळण्यासाठी आणि सामना जिंकण्यासाठी सर्व मार्ग अवलंबण्यासाठी प्रेरित करते.”
पुढे बोलताना रोहित म्हणाला की, “सर्व खेळाडूंना मोठ्या संख्येने असलेल्या प्रेक्षकांपुढे खेळण्याची सवय आहे. हे तुमच्या बाजूने काम करते. ते तुमच्या विरोधात जाऊ शकत नाही. खेळाडूंना यामध्ये खूपच आनंद येतो. हे खेळासाठी चांगले आहे.”
खरं तर, भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघ नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये विक्रमी 1 लाख 32 हजार प्रेक्षकांपुढे एकमेकांशी भिडतील. हा सामना खूपच रोमांचक होण्याची आशा आहे. (captain rohit sharma says boys enjoyed playing in front of fans ind vs pak cwc 2023)
हेही वाचा-
विश्वचषकात विजयाची हॅट्रिक करताच कॅप्टन विलियम्सन ‘या’ 2 धुरंधरांवर भलताच खुश; म्हणाला, ‘तुम्ही इथे…’
सचिनचा रेकॅार्ड मोडायची विराटला करियरमधली शेवटची संधी? पाहा काय आहे रेकॅार्ड!