दुबई। आज आज (28 सप्टेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश संघात एशिया कप 2018 चा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारताने सुपर फोरमधील शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध विश्रांती दिलेल्या पाचही खेळाडूंचा 11 जणांच्या संघात समावेश केला आहे. यात कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल यांचा समावेश आहे.
तर बांगलादेश संघात नाझमुल इस्लामला संधी देण्यात आली आहे. त्यांना हा सामना शाकिब अल हसन आणि तमीम इक्बाल या महत्त्वाच्या फलंदाजांशिवाय खेळावा लागणार आहे.
शाकिबला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली आहे. तर या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात इक्बाल दुखापतग्रस्त झाल्याने उर्वरित स्पर्धेस मुकला आहे.
या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ सातव्यांदा एशिया कपचे विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक आहे तर बांगलादेशही पहिल्यांदा एशिया कपचे विजेते होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
भारत आणि बांगलादेश आत्तापर्यंत 34 वेळा वनडेत आमने सामने आले असून भारताने यात 28 वेळा बाजी मारली आहे, तर बांगलादेशने 5 वेळा विजय मिळवला आहे. तसेच 1 सामना अनिर्णित राहिला आहे.
याबरोबरच एशिया कपस्पर्धेत हो दोन संघ आत्तापर्यंत 11 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. यात भारताने 10 वेळा तर बांगलादेशने 1 वेळा विजय मिळवला आहे.
असे आहेत 11 जणांचे संघ-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन(उपकर्णधार), अंबाती रायडू, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा.
IND XI: RG Sharma, S Dhawan, A Rayudu, D Karthik, MS Dhoni, K Jadhav, R Jadeja, B Kumar, Y Chahal, K Yadav, J Bumrah
— BCCI (@BCCI) September 28, 2018
बांगलादेश: मशर्रफ मोर्ताझा (कर्णधार), मोहम्मद मिथुन, लिटन दास, मुशफिकर रहिम, महमदुल्ला, मेहदी हसन, नाझमुल इस्लाम, रुबेल हुसेन, मुस्तफिजुर रहमान, सौम्य सरकार, इमरुल कायेस
BAN XI: L Das, Soumya Sarkar, M Rahim, M Mithun, I Kayes, Mahmudullah, M Hasan, M Mortaza, N Islam, R Hossain, M Rahman
— BCCI (@BCCI) September 28, 2018
महत्वाच्या बातम्या-
–आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या गंभीरचा क्रिकेटमधील मोठा विक्रम
–एशिया कपमध्ये सचिनने केले होते शतकांचे शतक; पण टीम इंडियाचा झाला होता नकोसा पराभव
–आज धोनीला ‘कूल’ विक्रम करण्याची संधी; होणार सचिन, द्रविडच्या यादीत सामील!