भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या 36 वर्षांचा आहे. 30 एप्रिल म्हणजे अजून दोन महिन्यांनंतर रोहित 37 वर्षांचा होईल. गुरुवारी (15 फेब्रुवारी) भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये सुरू झाला. या सामन्याच्या पहिल्या दिवशी रोहित शर्मा याने कसोटी कारकिर्दीतील 11वे शतक पूर्ण केले. या खेळीनंतर रोहित या फॉरमॅटमध्ये शतक करणारा सर्वात वयस्कर भारतीय कर्णधार देखील बनला.
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील ही कसोटी मालिका पाच सामन्यांची आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारत आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी एक-एक विजय मिळवला आहे. तिसरा कसोटी सामना गुरुवारी राजकोटमध्ये सुरू झाला. भारताने या सामन्यातील पहिल्या डावात आपल्या सुरुवातीच्या तीन विकेट्स स्वस्तात गमावल्या होत्या. पण कर्णधार रोहितने आपली जबाबदारी चोख पार पाडली. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्यासोबत रोहित शर्मा (Rohit Sharma) याने द्विशतकी भादीदारी केली. 36 वर्ष 291 दिवस वय असताना रोहितने 196 चेंडूत 131 धावांची ही खेळी केली.
भारतासाठी कसोटी शतक करणाऱ्या सर्वात वयस्कर कर्णधारांचा विचार केला, तर रोहितने गुरुवारी विजय हजारे यांना पछाडले. कर्णधार विजय हजारे यांनी 1951 मध्ये इंग्लंडविरुद्ध 26 वर्ष आणि 278 दिवस वय असताना कसोटी शतक केले होते. आता रोहित या खास विक्रमाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर विजय हजारे आहेत. यादीतील चौथ्या क्रमांकावर पुन्हा एकदा रोहित शर्मा आहे. मागच्या वर्षी जुलै महिन्यात त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध हे शतक केेल होते. त्यावेळी रोहितचे वय 36 आणि 73 दिवस होते. (Captain Rohit’s masterclass innings! At the age of 37, he scored a century and made a special record)
भारतासाठी कसोटी शतक करणारे सर्वात वयस्कर कर्णधार
🔹 36 वर्ष 291 दिवस – रोहित शर्मा विरुद्ध इंग्लंड , 2024
🔹 36 वर्ष 278 दिवस – विजय हजारे विरुद्ध इंग्लंड, 1951
🔹 36 वर्ष 236 दिवस – विजय विरुद्ध इंग्लंड, 1951
🔹 36 वर्ष 73 दिवस – रोहित शर्मा विरुद्ध वेस्ट इंडीज, 2023
Oldest Indian Captain to score Century in Test
36y 291d – Rohit Sharma v 🏴*
36y 278d – Vijay Hazare v 🏴
36y 236d – Vijay Hazare v 🏴
36y 73d – Rohit Sharma v 🏝️
35y 321d – Md Azharuddin v 🇳🇿
35y 285d – Rohit Sharma v 🇦🇺
35y 38d – Md Azharuddin v 🇦🇺 pic.twitter.com/vxGJtryNuI— CricBeat (@Cric_beat) February 15, 2024
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG : मार्क वुडच्या बाउन्सरने थोडक्यात बचावला रोहित शर्मा; पाहा व्हिडिओ
राजकोटमध्ये हिटमॅनचे राज! जबाबदारी घेत ठोकले कारकिर्दीतील 11 वे कसोटी शतक; भारत 200 पार