---Advertisement---

राजकोटमध्ये हिटमॅनचे राज! जबाबदारी घेत ठोकले कारकिर्दीतील 11 वे कसोटी शतक; भारत 200 पार

Rohit Sharma
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना गुरुवारी (15 फेब्रुवारी) राजकोटमध्ये सुरू झाला. सामन्याच्या पहिल्याच डावात भारताने सुरुवातीच्या तीन विकेट्स स्वस्तःत गमावल्या. पण सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा खेळपट्टीवर टिकून राहिला. रोहितने या सामन्यात कसोटी कारकिर्दीतील 11वे कसोटी शतक साकारले.

उभय संघांतील या सामन्याची नाणेफेक भारताने जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाची धावसंख्या 33 अशताना भारताने रजत पाटिदार याच्या रुपात तिसरी विकेट गमावला. रजत वैयक्तिक 5 धावा करून तंबूत परतला. त्याआधी सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने 10, तर शुबमन गिल यांने शुन्यावर विकेट गमावली. पण त्यानंतर चौथ्या विकेटसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी मोठी भागीदारी उभी केली.

रोहितने 157 चेंडूत 100 धावांचा टप्पा पूर्ण केला. यात 11 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. भारताच्या डावातील 53व्या षटकात रोहितने आपले शतक पूर्ण केले. या षटकाखेर भारताची धावसंख्या 3 बाद 190 होती.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.
(Rohit Sharma scored his 11th Test century in Rajkot Test)

बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या – 
IND vs ENG : सरफराज खानला कॅप देताना अनिल कुंबळेचे वक्तव्य व्हायरल; म्हणाले,’सरफू…
Ind vs Eng : BCCIने कसोटी मालिकेदरम्यान ‘या’ खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता; आता खेळणार ‘या’ संघाकडून 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---