भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी20 मालिका 2-1ने खिशात घातली. यानंतर आता उभय संघांमध्ये गुरुवारपासून (दि. 6 ऑक्टोबर) 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी शिखर धवन याच्या खांद्यावर आहे. मागील दोन वर्षांपासून वनडे क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या धवनला फिट राहून 2023मध्ये भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी खेळायचे आहे.
शिखर धवन (Shikhar Dhawan) याने श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय वनडे क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे. आता तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. अशात मालिकेपूर्वीच धवनने 2023मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषकाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. त्याने म्हटले आहे की, फिटनेस खूप महत्त्वाची आहे. तो फिट राहून 2023मध्ये भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी खेळायचे आहे.
💬💬 ‘We have a good squad and it is great to see fresh energy and enthusiasm among the new players in the side’ – #TeamIndia captain @SDhawan25 ahead of the #INDvSA ODI series 👍 pic.twitter.com/IxuwGy5BBF
— BCCI (@BCCI) October 5, 2022
धवनने सामन्यापूर्वी म्हटले की, “मी नशीबवान आहे की, मला इतकी शानदार कारकीर्द लाभली. जेव्हाही संधी मिळते, मी आपले ज्ञान युवा खेळाडूंसोबत वाटतो. आता माझ्यासाठी नवीन जबाबदारी आहे, पण मी आव्हानांमध्ये संधी शोधतो आणि याचा आनंद घेतो. माझे लक्ष्य 2023चे विश्वचषक आहे. मला स्वत:ला फिट ठेवायचे आहे. तसेच, मला सकारात्मकही राहायचे आहे.”
Shikhar Dhawan will lead a fresh-looking India side during the three-match ODI series against South Africa.
Details ➡️ https://t.co/pM6XCMpgbN#INDvSA pic.twitter.com/ChBW9UdoVf
— ICC (@ICC) October 3, 2022
शिखर धवनची कारकीर्द
शिखर धवन याने भारतीय क्रिकेट संघाकडून 34 कसोटी सामने, 158 वनडे सामने आणि 58 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत 40.61च्या सरासरीने 2315 धावा चोपल्या आहेत. वनडेत त्याने 45.84च्या सरासरीने 6647 धावांचा पाऊस पाडला आहे. या दोन्ही क्रिकेट प्रकारात मिळून त्याने एकूण 24 शतके झळकावली आहेत. यातील 17 शतके ही वनडेतील आणि 7 शतके ही कसोटीतील होती. याव्यतिरिक्त टी20त त्याने 27.92च्या सरासरीने 1759 धावा चोपल्या आहेत.
टी20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता वनडे मालिकाही आपल्या नावावर करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. मात्र, या मालिकेत टी20त असणाऱ्या अनेक खेळाडूंचा समावेश नाहीये. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. आता पहिल्या वनडे सामन्यात पाऊस व्यत्यय आणतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटने दाखवली किशोरदांच्या बंगल्यात बनवलेल्या रेस्टॉरंटची झलक, व्हिडिओ पाहिला का?
एकच मारला, पण कच्चून मारला! पंजाबच्या पठ्ठ्याने भिरकावला 108 मीटरचा गगनचुंबी षटकार, पाहा व्हिडिओ