---Advertisement---

IND vs SL: श्रीलंकाविरुद्ध मालिकेआधी कर्णधार गिल आणि प्रशिक्षक गंभीर चिंतेत! जाणून घ्या नेमकं कारण

On: मंगळवार, ऑगस्ट 11, 2026 7:17 PM
---Advertisement---

टीम इंडियाला (Team india) जर आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद (WTC) 2027 चा अंतिम सामना खेळायचा असेल, तर श्रीलंकेविरुद्ध 2-0 ने मालिका जिंकावी लागणार आहे. यासाठी सध्या भारतीय संघ (Indian cricket team) जोरदार सराव करत आहे. मात्र, तरीही संघात काही त्रुटी दिसून येत आहेत. त्यामुळेच कर्णधार शुबमन गिल Shubman gill & Gautam Gambhir) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर चिंतेत दिसले, ज्यामुळे सराव सत्रादरम्यान वातावरण थोडे गरम झाल्याचे दिसून आले होते, मात्र आता याचे नेमके कारण स्पष्ट झाले आहे.

श्रीलंकेत विजय मिळवण्यासाठी भारतीय फलंदाजांना फिरकी गोलंदाजीविरुद्ध (स्पिन) अत्यंत दमदार फलंदाजी करावी लागेल. सध्या या बाबतीत परिस्थिती चिंताजनक आहे. फिरकी गोलंदाजीविरुद्ध भारतीय फलंदाजांची अलिकडच्या काळातील कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यामुळे सराव सत्रातही कर्णधार शुबमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांना याच गोष्टीची चिंता सतावते आहे. या मालिकेतही टीम इंडियाला विजय मिळाला नाही, तर कसोटी प्रकारातून गौतम गंभीर यांना मुख्य प्रशिक्षक पदावरून हटवले जाऊ शकते. तसेच शुबमन गिलच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते.

त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे तयारी करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. जेणेकरून चुकांना अजिबात वाव राहणार नाही. नुकत्याच काही काळात कसोटी फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची कामगिरी खूपच खराब राहिली आहे, ज्यामुळे सर्वच खेळाडूंवर मोठा दबाव आहे. अशा परिस्थितीत कर्णधार आणि प्रशिक्षकाला भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाकडून (Ravindra Jadeja) सर्वाधिक अपेक्षा आहेत. तोच संघाला योग्य संतुलन मिळवून देऊ शकतो.

याशिवाय, फलंदाजीत सरफराज खानच्या पुनरागमनामुळे फिरकीविरुद्धची कमजोरी दूर होण्यास मदत होऊ शकते. मात्र या सगळ्यांनंतरही कर्णधार शुबमन गिल, उपकर्णधार के. एल. राहुल आणि अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांना मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---