आयपीएल २०२० चा अंतिम सामना दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा खेळला जात आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच दिल्ली कॅपिटल्सला तीन धक्के देत सामन्यात आघाडी मिळवली होती. मात्र, कर्णधार श्रेयस अय्यर आणि यष्टीरक्षक रिषभ पंत यांनी चौथ्या गड्यासाठी ९६ धावांची भागीदारी करत दिल्लीला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्या दरम्यान दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने अर्धशतकी खेळी करत दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले.
संघ अडचणीत असताना श्रेयस अय्यरने झुंजार खेळी करत अर्धशतक साजरे केले. याचबरोबर तो आयपीएलच्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकणारा सहावा कर्णधार बनला. श्रेयसआधी अशी कामगिरी पाच वेगवेगळ्या कर्णधारांनी केली आहे.
आयपीएलची सुरुवात २००८ मध्ये झाली तरी, कर्णधाराने अंतिम सामन्यात अर्धशतक साजरे करण्यासाठी; २०१३ साल उजडावे लागले. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने २०१३ आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्यांदा ही कामगिरी केली. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने २०१५ आयपीएल मध्ये अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
आयपीएल २०१६ च्या अंतिम सामन्यात उभय संघातील कर्णधारांनी अर्धशतक झळकविण्याची किमया केली होती. या अंतिम सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली यांनी अर्धशतके पूर्ण केलेली. २०१७ आयपीएलच्या अंतिम सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंटचा कर्णधार स्टीव स्मिथ अर्धशतक पूर्ण करण्यात यशस्वी ठरला होता. त्यानंतर तीन वर्षाने आज श्रेयस अय्यरने अशी कामगिरी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL FINAL: २०१७ ला मुंबईने केलेला कारनामा आता दिल्लीही करणार का?
नादच खुळा! रोहितच्या मुंबई इंडियन्सने असे असले विरोधी संघांच्या फलंदाजांच्या नाकीनऊ
IPL FINAL: आयपीएलमध्ये पहिल्याच चेंडूवर घडला इतिहास; वाचा कोणता झाला पराक्रम
ट्रेंडिंग लेख-
चौथी शिकलेल्या पोराच्या फिरकीपुढे भल्याभल्यांनी घेतलीये गिरकी; वाचा मुंबईच्या प्रमुख फिरकीपटूबद्दल
विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय