मँचेस्टर। गुरुवारी(27 जून) 2019 विश्वचषकातील 34 वा सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत विरुद्ध विंडीज संघात पार पडला. या सामन्यात विंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू कार्लोस ब्रेथवेटला पंचांच्या निर्णयाला असंतोष दर्शवल्याबद्दल मॅच फिच्या 15 टक्के करण्यात आला आहे.
आयसीसीने प्रसिद्धी पत्रकात या बद्दल म्हटले आहे की ब्रेथवेटने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आयसीसीच्या आचारसंहितेतील कलम 2.8 चे उल्लंघन केले आहे. हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचांच्या निर्णायला असंतोष दर्शवल्याबद्दल आहे.
याबरोबरच ब्रेथवेटला 1 डिमिरिट पॉइंटही देण्यात आला आहे. त्याचा हा सप्टेंबर 2016 मध्ये आयसीसीने सुधारित आचारसंहिता लागू झाल्यापासूनचा दुसरा डिमिरिट पॉइंट आहे. याआधी याच विश्वचषकात 14 जूनला इंग्लंड विरुद्च्या सामन्यानंतर त्याला 1 डिमिरिट पॉइंट देण्यात आला होता.
गुरुवारी भारताविरुद्धच्या सामन्यात ब्रेथवेटने 42 व्या षटकातील टाकलेला एक चेंडू मैदानावरील पंचांनी वाईड घोषित केला. याबद्दल ब्रेथवेटने नाराजी व्यक्त केली होती.
ब्रेथवेटने त्याची चूक मान्य केली असून सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी सुनावलेली शिक्षा मान्य केली आहे. त्यामुळे अधिकृत सुनावणीची गरज लागली नाही.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–करुणारत्ने असा नकोसा विक्रम करणारा विश्वचषक इतिहासातील पहिलाच कर्णधार
–खुद्द रोहित शर्मानेच दिला विंडीज विरुद्ध तो नाबाद असल्याचा पुरावा
–…म्हणून कारकिर्दीत आलेल्या परिवर्तनाबद्दल शमीने दिले स्वत:लाच श्रेय