नेहमी म्हटले जाते की, टी२० क्रिकेट हा युवा खेळाडूंचा खेळ आहे. टी२० मध्ये वेगाने धावा कराव्या लागता, तसेच विकेट्सही घ्याव्या लागतात. परंतु न्यूजीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात ३४ वर्षीय गोलंदाजांनी अशी कामगिरी करून दाखवली आहे, जी युवा गोलंदाजांना देखील लाजवेल. या गोलंदाजाने चार षटकात अवघ्या १९ धावा दिल्या आणि तब्बल पाच विकेट्स घेतल्या आहेत.
या गोलंदाजांचे नाव आहे सेठ रांस (seth rance), जो सध्या न्यूझीलंमध्ये सध्या खेळल्या जात असलेल्या सुपर स्मॅश लीगमधील खेळत आहे. हा सामना सेंट्रल डिस्ट्रिक्टस आणि ओटागो यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सेठ रांसने त्याच्या गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले. या सामन्यात सेंट्रल डिस्ट्रिक्टने पहिल्यांदा फलंदाजी केली आणि मर्यादित २० षटकांमध्ये ४ विकेट्सच्या नुकसानावर १८० धावा केल्या. सेंट्रल डिस्ट्रिक्टसाठी या सामन्यात ग्रेग हे याने ५५ चेंडूत सर्वाधिक ७६ धावा केल्या. तसेच यष्टीरक्षक फलंदाज डेन क्लीवरने देखील ४५ धावांचे योगदान दिले. तर कर्णधार टॉम ब्रुसने १५ चेंडूत नाबात २६ धावा केल्या.
त्यानंतर ओटागोसमोर विजयासाठी १८१ धावांचे लक्ष्य होते. मात्र, सेंट्रल डिस्ट्रिक्टच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे ओटागो संघ स्वस्तात तंबूत परतला. ओटागोच्या डावाच्या सुरुवातीपासूनच विरोधी संघाच्या गोलंदाजांनी वर्चस्व तयार करायला सुरुवात केली. परिणामी ओटागो संघ २० षटके संपेपर्यंत मैदानात टिकू शकला नाही. ओटागोचा संपूर्ण संघ १६.५ षटकात सर्वबाद झाला. त्यांनी १९ चेंडू शिल्लक ठेवून १२७ धावा केल्या आणि ५८ धावांनी पराभव पत्करला.
ओटागो संघाच्या या सामन्यात झालेल्या अवस्थेला प्रमुख कारणीभूत ठरला सेठ रांस. त्याने या सामन्यात एकूण ३.५ षटके गोलंदाजी केली आणि १९ धावा देऊन पाच महत्वाच्या विकेट्स मिळवल्या. या पाच विकेट्सपैकी चार विकेट्स ह्या विरोधी संघाच्या वरच्या फळीतील होत्या आणि त्यामुळे विरोधी संघ लवकर सर्वबाद झाला. ओटागो संघाला लवकर गुंडाळण्यामध्ये सेट्रल डिस्ट्रिक्टचा कर्णधार टॉम ब्रुसने देखील महत्वाचे योगदान दिले. ब्रुसने या सामन्यात २ षटके गोलंदाजी केली आणि ९ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या.
दरम्यान, या सामन्यात रांसने केलेले हे प्रदर्शन त्याच्या संपूर्ण टी२० कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरले आहे. त्याने आतापर्यंत ७६ टी२० सामने खेळले आहेत आणि यामध्ये ९० विकेट्स स्वतःच्या नावावर नोंदवल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन वेळा चार-चार विकेट्स घेतल्या होत्या, पण पाच विकेट्स घेण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे.
महत्वाच्या बातम्या –
गोलंदाज असूनही अँडरसनने केला फलंदाजीतील ‘न भूतो न भविष्यती’ पराक्रम
अश्विन पुन्हा दिसणार सीएसकेच्या रंगात? मेगा लिलावापूर्वी म्हणाला…
पीवायसी-पुसाळकर पीवायसी प्रीमियर क्रिकेट लीग 2021 स्पर्धेत टस्कर्स, जॅगवॉर्स संघांचा सलग तिसरा विजय