दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रविवारी (२ मे) डबल हेडरचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने ५५ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यातील पहिल्या डावात तुफानी खेळी करत शतक झळकावणाऱ्या जोस बटलरने नवीन किर्तीमान आपल्या नावावर करत दिग्गज खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थान रॉयल्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरने अवघ्या ६४ चेंडूत १२४ धावांची खेळी केली होती. यात त्याने ११ चौकार आणि ८ लांबच लांब षटकार लगावले होते. हे तुफानी शतक झळकावताच तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना शतक झळकावणारा तिसरा परदेशी फलंदाज ठरला आहे. या यादीत शेन वॉटसन, बेन स्टोक्स यांसारख्या दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे.
राजस्थान रॉयल्स संघासाठी शतक झळकावणारे परदेशी खेळाडू
१) शेन वॉटसन (कोलकाता नाईट रायडर्स ,२०१३)
२)शेन वॉटसन (विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स,२०१५)
३)बेन स्टोक्स (मुंबई इंडियन्स ,२०२०)
४) जोस बटलर (सनरायझर्स हैदराबाद, २०२१)
सामन्याचा विचार करता राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकाअखेर ३ गडी बाद २२० धावा केल्या होत्या. यामध्ये जोस बटलरने महत्वाची खेळी केली होती. त्याने अवघ्या ६४ चेंडूत १२४ धावांची खेळी केली होती. तसेच कर्णधार संजू सॅमसनने ४८ धावांची खेळी केली होती.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघातील मुख्य फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. या संघाकडून मनीष पांडेने सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने ३० धावा केल्या होत्या. इतर खेळाडूंना मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले होते. राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत ६ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. तर हैदराबाद संघ २ गुणांसह ८ व्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बटलरच्या शतकाने विलियम्सनवर ओढवली नामुष्की, नावे झाला ‘हा’ नकोसा विक्रम
RR vs SRH : राजस्थानने उडवला हैद्राबादचा धुव्वा, ५५ धावांनी मिळवला ‘रॉयल’ विजय