भारत आणि इंग्लंड यांच्यात शुक्रवारपासून (१२ मार्च) ५ सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मालिका खेळवली जाईल. भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १२४ धावा बनवल्या. त्यानंतर १२५ धावांचे आव्हान इंग्लंडने १६ षटकांच्या आत पूर्ण केले आणि सामना ८ विकेट्सने जिंकली. दरम्यान, या सामन्यात भारताचा प्रमुख फिरकीपटू म्हणून खेळत असलेल्या युजवेंद्र चहलने एक खास आकडा आपल्या कारकीर्दीत गाठला.
चहल उतरला शंभराव्या आंतरराष्ट्रीय सामन्यात
सध्या भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा प्रमुख फिरकीपटू असलेला युजवेंद्र चहल ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. या सामन्यात मैदानात उतरताच चहलने भारतासाठी १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचे कामगिरी केली.
सध्या ३० वर्षाचा असलेल्या चहलने २०१६ मध्ये भारतीय संघासाठी झिम्बाब्वे दौर्यावर भारतासाठी वनडे व टी२० सामन्यात पदार्पण केले होते. तेव्हापासून आजपर्यंत तो भारतीय संघासाठी ५४ वनडे व आजच्या सामन्यासह ४६ टी२० सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याला अनुक्रमे ९१ व ६० बळी घेण्यात यश आले आहे.
शंभरावा सामना संस्मरणीय
टी२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीमध्ये युजवेंद्र चहल जसप्रीत बुमराहला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला आहे. त्याने जॉस बटलरला बाद करत आंतरराष्ट्रीय टी२०मधील ६० वी विकेट घेतली. बुमराहच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५९ विकेट्स आहेत.
बीसीसीआयने केले ट्वीट
आपला शंभरावा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या चहलचे बीसीसीआयने ट्विट करत अभिनंदन केले. बीसीसीआयने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘आज आपला शंभरावे आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या युजवेंद्र चहलचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.’
Congratulations & best wishes to @yuzi_chahal who will be playing his 1⃣0⃣0⃣th international game today. 👏👏@Paytm #INDvENG #TeamIndia pic.twitter.com/iTSr6cNfC0
— BCCI (@BCCI) March 12, 2021
सुरुवातीला बुद्धिबळपटू असलेला चहल नंतरच्या काळात क्रिकेटकडे वळाला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सुरुवात केल्यानंतर तो गेल्या ७ वर्षापासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. भारतीय संघात कुलदीप यादवसह त्याची चांगली जोडी जमलेली दिसून येते.
महत्त्वाच्या बातम्या –
अरर! विराट केवळ शुन्यावर बाद तर झालाच पण ‘या’ नकोशा यादीत गांगुली, धोनीलाही टाकले मागे
आदिल रशीदला मोठा फटका मारण्याच्या नादात कोहली भोपळाही न फोडता माघारी, पाहा व्हिडिओ