येत्या २४ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये रंगणार आहे. जगातील सर्वात मोठे स्टेडियम असण्याचा मान मोटेरा स्टेडियमला मिळाला आहे.दोन्हीही संघ या मालिकेत १-१ विजय मिळवत बरोबरीत आहे. अशातच दोन्ही संघासमोर विजयाचे मोठे आव्हान असणार आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून बाहेर होऊ शकतो.
अशातच तिसरा कसोटी सामना सुरू व्हायला तीन दिवस उरले असताना. सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असणारी युजवेन्द्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
धनश्रीचा डान्स करतानाचा व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
धनश्री ही एक युट्युबर आणि कोरयोग्राफर आहे. यामुळेच ती सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते आणि आपले डान्स करतानाचे व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती क्रिकेटच्या रंगात रंगलेली दिसून येत आहे. तसेच ती डान्स करताना मध्येच गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याची एक्टिंग देखील करत आहे.या व्हिडिओला प्रचंड शेअर केले जात आहे. तसेच पोस्ट केल्यानंतर अवघ्या २ तासातच हा व्हिडिओ २ लाख लोकांनी पहिला होता.
https://www.instagram.com/p/CLgszJCJ4sO/
श्रेयस अय्यरबरोबरही केला होता डान्स –
काही दिवसांपूर्वीच धनश्रीने भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरसह डान्स केला होता. या डान्सच्या व्हिडिओलाही मोठ्याप्रमाणात चाहत्यांची पसंती मिळाली होती.
https://www.instagram.com/p/CLJKHmsp4aU/
डिसेंबर महिन्यात युजवेंद्र चहल सोबत बांधली होती लगीनगाठ
भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी ऑगस्ट २०२० मध्ये साखरपुडा केला होता. ही गोड बातमी त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत आपल्या चाहत्यांना सांगितली होती. त्यांनतर चहल आयपीएल २०२० स्पर्धा खेळण्याकरिता दुबईला गेला होता. दुबईवरून परतल्यानंतर डिसेंबर २०२० रोजी त्यांनी लग्न केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल लिलावाच्या इतिहासात खर्च झालेली रक्कम ऐकून चक्रावून जाल; प्रत्येक देशांना मिळालाय इतका वाटा
भारतात कोहली तर पाकिस्तानमध्ये आझमचा डंका; टी२० लीगच्या ‘या’ मोठ्या विक्रमात दोघेही अव्वल
जोकोविचचा नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदावर कब्जा; मेदवेदेव फायनलमध्ये पराभूत