चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे आयोजन करेल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तानसह एकूण 8 संघ सहभागी होत आहेत. पण जेतेपद जिंकण्याच्या शर्यतीत कोणते संघ पुढे आहेत? या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारे टॉप-4 संघ कोणते असतील? या प्रश्नाचे उत्तर इंग्लंडचे माजी कर्णधार केविन पीटरसन यांनी दिले आहे. खरंतर, केविन पीटरसनचा असा विश्वास आहे की इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारखे संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकणार नाहीत. यामागील कारणही त्यांने स्पष्ट केले.
केविन पीटरसन म्हणाला की, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टॉप-4 संघांची निवड करणे सोपे नाही, खूप कठीण आहे. पण मला वाटतं की भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे या स्पर्धेतील टॉप-4 संघ असू शकतात. मिचेल स्टार्कच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे, असे केविन पीटरसनचे मत आहे. त्याने सांगितले की, भारत आणि पाकिस्तान हे दोन आशियाई संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. याशिवाय, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
केविन पीटरसनचा असा विश्वास आहे की अनेक मोठे ऑस्ट्रेलियन खेळाडू दुखापतींशी झुंजत आहेत. याशिवाय, अनेक खेळाडूंनी स्पर्धेतून आपली नावे मागे घेतली आहेत. ज्यामध्ये मिचेल स्टार्क सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. वास्तविक, मिचेल स्टार्कने वैयक्तिक कारणांमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडबद्दल केविन पीटरसनचे काय मत आहे? केविन पीटरसन म्हणाला की, अलिकडेच भारताने एकदिवसीय मालिकेत इंग्लंडला व्हाईटवॉश केले. याचा मोठा परिणाम होणार आहे. या पराभवाचा परिणाम इंग्लंडच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील कामगिरीवर होईल.
हेही वाचा-
IPL 2025: हंगामाची सुरुवात RCB च्या सामन्याने, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट!
WPL स्पर्धेला आजपासून सुरुवात, जाणून घ्या कधी कुठे पाहायचा सामना
बीसीसीआयचे नवे नियमन, खेळाडूंच्या कुटुंबीयांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘नो एन्ट्री’!






