आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत 6 संघांची घोषणा करण्यात आली आहे. ज्या दोन संघांची अद्याप घोषणा झालेली नाही. त्यात भारत आणि पाकिस्तानचा समावेश आहे. मात्र दोन्ही संघांची घोषणा या आठवड्याच्या अखेरीस होण्याची अपेक्षा आहे. एकदिवसीय विश्वचषकादरम्यान केएल राहुलच्या विकेटकीपिंग कर्तव्यांमुळे भारताला काही प्रमाणात संतुलन मिळाले. पण आता कर्नाटकचा हा फलंदाज मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुन्हा ही जबाबदारी स्वीकारू शकेल अशी शक्यता कमी दिसते.
विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी 19 जानेवारी रोजी राष्ट्रीय निवड समितीची बैठक होणार आहे. ज्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 15 सदस्यीय संघाची निवड केली जाईल. या बैठकीत कुलदीप यादव वेळेत तंदुरुस्त न झाल्यास दुसऱ्या यष्टीरक्षक आणि लेग स्पिनरबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती रिषभ पंत आहे यात काही शंका नाही. संघातील दुसऱ्या यष्टीरक्षकाच्या स्थानासाठी ध्रुव जुरेल, संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्यात तिरंगी लढत होऊ शकते. सध्याच्या परिस्थिती पाहता, ध्रुव जुरेलही आघाडीवर आहे.
आगामी चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी भारतीय संघ इंग्लंडशी भिडणार आहे. या मालिकेत टीम इंडिया आणि इंग्लिश संघ 3 वनडे सामने खेळणार आहे. यासाठी दोन्ही संघात चुरशीची लढत पाहायला मिळेल. पण या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने अद्याप भारतीय संघ जाहीर केलेला नाही. पण सुत्रांनुसार 19 जानेवारी पर्यंत संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच निवडला जाणारा संघ चॅम्पियन्स ट्राॅफीमध्येही खेळण्याची शक्यता आहे. अश्या परिस्थितीत कोणत्या खेळाडूंची निवड होणार हे पाहणे रंजक ठरेल. वनडे मालिकेपूर्वी भारत आणि इंग्लंड 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत आमने-सामने येतील.
हेही वाचा-
Kho-Kho WC 2025; टीम इंडियाची विजयी सलामी, रोमांचक सामन्यात नेपाळला लोळवलं
IPL 2025 UPDATE; पहिल्या आणि अंतिम सामन्याचे ठिकाण ठरले, या मैदानावर रंगणार प्लेऑफ्सचा थरार
खराब फाॅर्ममधून जाणारा रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये परतणार, चक्क इतक्या वर्षांनी स्पर्धेत खेळणार