भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदौरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाणार आहे. 1 मार्च रोजी हा सामना सुरू होणार असून या सामन्यात भारतीय संघा कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह उतरणार? हा सध्या चर्चेचा विषय आहे. यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत याने या मालिकेतून कसोटी पदार्पण केले आणि तिसऱ्या कसोटीआधी महत्वाची माहिती देखील चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील ही बॉर्डर गावसकर कसोटी मालिका चार सामन्यांची आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत केले असून 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला असून दुसऱ्या सामन्यात पाहुण्यास ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत (KS Bharat) एकही मोठी खेळी करू शकला नाही. पण तरीही तिसऱ्या कसोटीत त्याची जागा पक्की समजा, अशी प्रतिक्रिया यष्टीरक्षक फलंदाजाने दिली.
केएस भरतने पहिल्या कसोटीत 8 धावा करून विकेट गमावली होती. दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात भरत 6 तर दुसऱ्या डावात नाबाद 23 धावा करून बाद झाला. दिल्ली कसोटीतील दुसऱ्या डावात भरतने केलेल्या धावा संघासाठी महत्वाच्या ठरल्या. तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत झालेल्या चर्चेचा खुलासा केला, ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. रिषभ पंतला डिसेंबर 2022मध्ये अपघातानंतर गंभीर दुखापत झाल्याने कसोटी संघात केएस भरत आणि ईशान किशन हे दोन यष्टीरक्षकाचे पर्याय होते.
नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यातून भरतने कसोटी पदार्पण केले. तिसऱ्या कसोटीपूर्वी भरतने रोहितने त्याला सांगितलेल्या काही गोष्टी सार्वजनिक केल्या. भरतने सांगितल्यानुसार कर्णधार रोहित म्हणाल की, “तुला दुसऱ्या डावात 6व्या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे. मी या स्थानावर खेळून संघासाठी योगदान द्यायला पूर्णपणे तयार होतो. रोहित शर्माने हेदेखील सांगितले की, तू डीआरएसवर चांगला निर्णय घेतो. तू तुझ्या मनाचे ऐक.”
कर्णधार रोहित शर्मासह मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघाचा माजी कर्णदार विराट कोहली देखील केएस भरतच्या खेळीवर आनंदी असल्याचे दिसल. दिल्ली कसोटी सामन्याच जेव्ह भरतने षटकार मारला, तेव्हा विराट आणि द्रविड त्याचे कौतुक करताना दिसले होते. भरतने जर तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवली, तर ईशान किशन (Ishan Kishan) याला कसोटी पदार्पणासाठी अधिक वाट पाहावी लागू शकते. ईशानने बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा दुखापतग्रस्त असताना प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवली आणि या फॉरमॅटमध्ये द्विशतक देखील ठोकले. (Chances of Ishan Kishan getting a chance in the third Test match are also less)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसी ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’मध्ये फक्त एक भारतीय खेळाडू! मेग लॅनिंगच्या हातून निसटले कर्णधारपद
आयपीएलच्या महिनाभर आधीच सट्टाबाजार गरम! मुंबई-चेन्नईला पछाडत ’हा’ संघ खातोय भाव