गुजरात टायटन्ससाठी हा त्यांचा इंडियन प्रीमियर लीगचा पहिला हंगाम आहे आणि यामध्ये त्यांनी अंतिम सामना गाठला आहे. त्याचा महत्वाचा फलंदाज डेविड मिलरला वाटते की, त्याने आयपीएलच्या चालू हंगामात फिरकी गोलंदाजांविषयीचे मानसिकता बदलली आहे. चालू हंगामातील प्रत्येक सामन्यात मिलर खेळला आहे आणि संघाच्या विश्वासास पात्र देखील ठरला आहे.
दक्षिण आफ्रिकी दिग्गज डेविड मिलर (David Miller) आयपीएल २०२२मध्ये (IPL 2022) आतापर्यंत खेळलेल्या १५ सामन्यांमध्ये ४४९ धावा करून बसला आहे, तर कर्णधार हार्दिक पंड्याने १४ सामन्यांमध्ये ४५३ धावा केल्या आहेत. गुजरातला रविवारी (२९ मे) राजस्थान रॉयल्ससोबत आयपीएलचा अंतिम सामना खेळायचा आहे. या सामन्याआधी मिलर म्हणाला की, “फिरकी गोलंदाजांसमोर माझ्यासाठी हा हंगाम चांगला गेला आहे. मी यावर खूप मेहनत घेतली आहे. मला कधीच वाटले नव्हते की, मी फिरकी गोलंदाजांना खेळू शकत नाहीये, पण मला यासाठी मेहनत घ्यावी लागली.”
“मी फिरकी गोलंदाजांविरोधातील माझी मानसिकता बदलली आहे. एक किंवा दोन गोष्टींमध्ये बदल केला. मला हे सुनिश्चित करायचे होते की, प्रत्येक चेंडूवर धाव घेईल. यामुळे गोलंदाजावर दबाव बनतो. मानसिक स्वरूपात मी यावर मेहनत घेतली आहे. या हंगामात मी वरच्या फळीत फलंदाजी केली. हंगामाच्या सुरुवातीपासून मी सर्व सामने खेळले आणि यामध्ये मला खूप मजा आली. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. संघाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी निवडप्रक्रियेविषयी चिंतेत नव्हतो,” असेही मिलर पुढे म्हणाला.
मिलरच्या मते गुजरात टायटन्सच्या प्रत्येक खेळाडूने चालू हंगामात चांगले प्रदर्शन केले आहे, ज्यामुळे संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला. संघाच्या यशाचे श्रेय देताना त्याने राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा यांच्या नावांचा उल्लेख केला, पण यश हे संपूर्ण संघाचे आहे, असे देखील सांगितले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एबी डिविलियर्सचा खरा वासरदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेवाल्ड ब्रेविसच्या यशाची गोष्ट
‘नेक्स्ट विराट’ मानला गेलेल्या उन्मुक्त चंदचं नक्की चुकलं काय? वाचा त्याच्या प्रवासाबद्दल