इंग्लंड आणि भारत यांच्यात सध्या सुरू असलेली वनडे मालिका १-१ अशा बरोबरीवर आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी (१७ जुलै) मॅनचेस्टरमध्ये खेळला जाणार आहे. लंडमध्ये खेळले गेलेले मालिकेतील पहिले दोन सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुरू झाले होते. परंतु तिसऱ्या वनडेची वेळ वेगळी आहे.
एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त प्रदर्शन केले होते, जो १२ जुलै रोजी खेळला गेला होता. कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने हा सामना एकही विकेट न गमावता जिंकला होता. त्यानंतर मालिकेती दुसरा सामना १४ जुलै रोजी खेळला गेला. परंतु या सामन्यात भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आणि संघ १०० धावांच्या मोठ्या अंतराने पराभूत झाला. तिसरा सामना निर्णायक ठरणार असून रविवारी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल. भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यातील हा शेवटचा सामना असेल.
भारतीय संघाला हा इंग्लंड दौऱ्यात अनेक चढ उतार पाहायला मिळाले. दैऱ्यात सर्वात आधी मागच्या वर्षी रद्द केला गेलेल्या पाचवा कसोटी सामना खेळला गेला. कसोटी सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड वाटत होते, पण शेवटच्या डावात त्यांच्या फलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले आणि सामनाही नावावर केला. शेवटच्या कसोटी सामन्यात पराभव मिळाल्यामुळे मागच्या वर्षी सुरू झालेली ही कसोटी मालिका २-२ अशा बरोबरीवर सुटली.
कसोटी सामना संपल्यानंतर उभय संघातील टी-२० मालिका सुरू झाली. टी-२० मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले. पहिला सामना ५० धावांनी, तर दुसरा सामना ४९ धावांना भारताने जिंकला. परंतु कसोटी सामन्याप्रमाणे टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली. शेवटचा टी-२० सामना भारताने १७ धावांनी गमावला.
सध्या सुरू असलेल्या वनडे मालिकेतही हीच गोष्ट पुन्हा एकदा पाहिली गेली. पहिल्या वनडेमध्ये भारताने सोपा विजय मिळवला. पण दुसऱ्या सामन्यात इंग्लिश गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाज अपयशी ठरले. परिणामी इंग्लंडने हा सामना १०० धावांनी जिंकला. आता मालिकेतील तिसरा सामना पाहण्यासारखा असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतापुढे ऑस्ट्रेलियाचे आव्हान, सुवर्णपदक जिंकण्यासाठी करतोय तयारी
VIDEO: लॅथमने आयर्लंडविरुद्ध केले खळखट्याक! प्रेक्षकांची झाली धावाधाव