बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीच भारतीय संघाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने सांगितले आहे की, बांगलादेश दौऱ्यात मोठे बदल झाले आहेत. त्यात रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. तसेच, संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी केएल राहुल याच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्याचसोबत रोहितच्या जागी धुरंधर फलंदाजाला ताफ्यात सामील केले आहे.
रोहितच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने दुसऱ्या वनडेत झालेल्या अंगठ्याच्या दुखापतीसाठी मुंबईतील एका तज्ज्ञाची भेट घेतली. या दुखापतीवर योग्य उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला असून तो बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी त्याच्या उपस्थितीवर बीसीसीआयचे वैद्यकीय पथक नंतर निर्णय घेईल. अशात रोहित बाहेर पडल्यामुळे निवडकर्त्यांनी पहिल्या कसोटीसाठी रोहितच्या जागी अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) याला संघात सामील केले आहे.
UPDATE 🚨: Changes to #TeamIndia’s squad for the Test series against Bangladesh.
Rohit Sharma ruled out of 1st Test. KL Rahul to lead. Abhimanyu Easwaran named as replacement.
Mohd Shami & Ravindra Jadeja ruled out of Test series. Navdeep Saini and Saurabh Kumar replace them.
— BCCI (@BCCI) December 11, 2022
शानदार फॉर्मात आहे अभिमन्यू
अभिमन्यू ईश्वरन विस्फोटक फलंदाजी करण्यात पटाईत आहे. त्याच्याकडे कोणत्याही गोलंदाजी आक्रमणाचा सामना करण्याची क्षमता आहे. बांगलादेशविरुद्धच्या अनधिकृत कसोटीत ईश्वरनने शतक ठोकल्यानंतर सर्वांचे लक्ष वेधले होते. तो सध्या शानदार फॉर्मात आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने आपला दम दाखवून दिला आहे. त्याला जर संधी मिळाली, तर 27 वर्षीय अभिमन्यू आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकतो. त्याच्या नावावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये 77 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 5419 धावांची नोंद आहे. त्यात त्याने 17 शतके आणि 23 अर्धशतकेही केली आहेत. त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 7 शतके आणि 21 अर्धशतकांच्या जोरावर 78 सामन्यात 3376 धावाही कुटल्या आहेत.
रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीही बाहेर, ‘या’ खेळाडूंना संधी
याव्यतिरिक्त रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) हेदेखील या संपूर्ण मालिकेतून बाहेर पडले आहेत. त्यांच्या जागी नवदीप सैनी (Navdeep Saini) आणि सौरभ कुमार (Saurabh Kumar) यांची संघात एन्ट्री झाली आहे.
बांगलादेश कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, केएस भरत, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू ईश्वरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार, आणि जयदेव उनादकट. (Changes to Team India for the Test series against Bangladesh rohit sharma ruled out and abhimanyu easwaran in squad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईशानच्या द्विशतकानंतर संपणार ‘या’ खेळाडूची कारकीर्द? दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य
ज्याच्या विक्रमाची केली बरोबरी, त्याच्याकडूनच मिळाली दाद; मॅक्युलमसमोर स्टोक्सचा नाद खुळा पराक्रम